गारगोटी,ता.भुदरगड,जि.काेल्हापूर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार लेखक इंद्रजीत पाटील यांच्या ‘ शेलक्या बारा ‘ या कथासंग्रहास जाहीर झाला हाेता.या पुरस्काराचे वितरण सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री.बजरंग देसाई,प्रमुख पाहुणे मा.नाम.प्रकाश आबिटकर,प्रमुख वक्ते मा.श्री.विजय चाेरमारे,मा.डाॅ.जयंत कळके,मा.डाॅ.उदयकुमार शिंदे,मा.श्री.कुलदीप राजे यांच्या उपस्थितीत श्री.शाहू वाचनालय,गारगाेटी येथे करण्यात आले.
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,राेख रक्कम,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.प्रस्तुत कार्यक्रमाचे आयाेजन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. श्री. मा.ग.गुरव, उपाध्यक्ष, श्री.डी.व्ही. कुंभार,सचिव श्री.बा.स.जठार,सदस्य डाॅ.श्री.अर्जुन कुंभार व इतर सदस्यांनी उत्तम केले. लेखक इंद्रजीत पाटील यांच्या ‘शेलक्या बारा ‘ या कथासंग्रहास अल्पावधीतच मिळालेला हा आठवा पुरस्कार असून ‘कळ पाेटी अाली आेठी’ या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहासही पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
यावर्षीचे अल्पावधीतच एकूण तेरा राज्यस्तरीय पुरस्कार इंद्रजीत पाटील यांना मिळाल्यामुळे बार्शी अन् ग्रामीण भागात त्यांचे विशेष काैतुक हाेत आहे. या पुरस्काराबद्दल श्री.चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.