कविता शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक

सन १९७५ मधील दहावी च्या माजी विद्यार्थ्यांकडून मालगुंड विद्यालयास स्मार्ट टीव्ही.ची स्तुत्य देणगी

अमित कांबळे /प्रतिनिधी

          रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड येथील सन १९७५ सालच्या इ.१० वी च्या पहिल्या बॅचने मालगुंड विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसाठी उत्तम प्रतीचा टी.व्ही. देणगी स्वरुपात विद्यालयाला सुपुर्द केला. 

       मालगुंड विद्यालयात घेण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी ही स्तुत्य देणगी दिली. यावेळी १९७५ साली दहावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल गुणवंत माजी विद्यार्थी मधुसूदन हरी लिमये यांनीही मालगुंड प्रशालेला रोख रुपये १ लाख ३० हजार रुपयांचा धनादेश तसेच ३ उच्च प्रतीचे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट टी. व्ही. संच देणगी स्वरुपात दिले.१९७५ सालच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या शाळेने घडवले, मोठे केले, स्वावलंबी बनवले. त्याच मालगुंड शाळेमध्ये एकत्रित स्नेहमेळावा घेऊन माजी विद्यार्थ्यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक शाळेला एक उत्तम प्रतिचा स्मार्ट टी.व्ही. संच भेट दिल्याबद्दल शिक्षण संस्था व शाळा यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांसह विशेष म्हणजे माजी शिक्षकही बहुसंख्येने सहभागी झाले होते.

या समारंभाला ३२ पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित होते. एक सुंदर अविस्मरणीय समारंभ माजी विद्यार्थ्यांनी उत्साहात पार पडला. या सर्व माजी विद्यार्थ्यांना शिकविणारे माजी शिक्षक उपस्थित होते. यामध्ये श्रीधर फडके, सौ सुवर्णा फडके, रमेश काणे, प्रभाकर बापट, नलिनी खेर, शंकर आंबेकर हे अतिशय तळमळीचे विद्यालयाचे माजी शिक्षक व कर्तव्य तत्पर माजी चतुर्थ श्रेणी कर्मचारी कृष्णा आग्रे उपस्थित होते.याच समारंभामध्ये माजी शिक्षक व माजी कर्मचारी यांना आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांमध्ये मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान सल्लागार मंडळाच्या सदस्या सौ.यशश्री पवार, तसेच शुभदा जोशी, विष्णू साळवी, भाई गांगण, शाम केळकर, दानशूर व्यक्तिमत्त्व मधुसूदन लिमये,शोभा काटकर, तसेच बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करून स्नेहमेळाव्याची रंगत अधिकच वाढवली.

पन्नास वर्षानिमित्य मालगुंड विद्यालयाचे माजी विद्यार्थी कृतज्ञता भावनेने एकत्र येऊन शाळेला मदतीचा हात दिला. अशा माजी विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमात अभिनंदन करण्यात आले.त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे शिक्षण संस्था व शाळेतर्फे कौतुक करण्यात आले. या दानशूर देणगीदार, तसेच सर्व माजी विद्यार्थी यांचे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे व उपक्रमशील चेअरमन सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक बिपीन परकर तसेच संस्थेचे सर्व संचालक यांनी धन्यवाद दिले.

Related posts

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना “अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार'”

kalaranjan news

स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला काॅलनीतील विद्यार्थ्यांनी साकारले सुंदर गणपती

kalaranjan news

वंचितांबरोबर साजरी केली दिवाळी

kalaranjan news