संस्था कोणतीही असो,ती संस्था मोठी होण्यामागे त्या संस्थेतील प्रत्येक घटक हा अत्यंत महत्वाचा असतो.मनमंथन लेखन-वाचन समूह हा असाच मोठा समूह आहे,जो देशभरातील साहित्यिकांना,कलाकारांना एकत्र करून मोठ्या दिमाखात विविध उपक्रमांसह राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे भव्य-दिव्य स्वरूपात आयोजन करुन जगाला आनंदाची शिकवण देणारा देशभरातील चिरतरुण साहित्यिकांचा संघ म्हणजेच मनमंथन वाचन-लेखन समूह आहे,असे गौरवोद्गार तिसर्या राज्यस्तरीय मनमंथन साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष तथा प्रख्यात लेखिका प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी काढले.
त्या दि.२४,२५ आणि २६ अशा तीन दिवस अतिशय उत्साहात,आनंदात समाजसेवक बाबा आमटे साहित्य नगरी आणि राम गणेश गडकरी सभामंडपात माहुली कृषी पर्यटन,पारशिवनी,जि.नागपूर येथे महाराष्ट्रभरातील साहित्यिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या तिसर्या राज्यस्तरीय मनमंथन साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष पदावरून बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्य शिरोमणी सन्मान प्राप्य सुप्रसिध्द लेखिका वर्षा विजय देशपांडे आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय लेखिका वैद्या माधुरी वाघ या होत्या.यावेळी व्यासपीठावर मनमंथन समूहाच्या संस्थापक,अध्यक्षा प्रेरणा वाडी,विजय देशपांडे,सतीश शिरसाट,आतिश सोसे,प्रदीप वाडी,वंदना पांडे,स्वागताध्यक्ष रश्मी कुलकर्णी,उपस्वागताध्यक्ष मंजूषा विश्वेकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तीनही मान्यवरांनी आता मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे पण मराठी आपली अमृताशी पैजेत जिंकणारी भाषा आहे. लहानपणापासूनच घराघरांमधून मराठीचा आग्रह धरायला हवा आणि लिखाणासोबतच वाचनाचाही आग्रह धरावा व वाचताना समजून वाचायला हवे हे सांगितले.
प्रथम सत्रात २४ तारखेला परिचय सत्र व वनवन्ही दरम्यान अनेक साहित्यिक खेळ घेण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष श्रीकांत विश्वेकर, प्रमुख पाहुणे प्रकाश टिकेकर व श्री संदीप कुळकर्णी होते. निवेदन विणा मुळे यांनी केले.दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता टाळ टिपऱ्यांच्या गजरात ध्वजारोहण, ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडी निघाली. पालखीचे भोई अतिशय उल्हासात ग्रंथाची पालखी खांद्यांवर मिरवीत होते.दीप प्रज्वलानंतर वाग्देवी पूजनाने संमेलनाचे विधीवत उद्घाटन झाले.
त्यानंतर अभिजात मराठी वरील मायबोलीचा शब्द गौरव हे पुस्तक , संस्थेची स्मरणिका शब्द फुलांची ओंजळ व कवयित्री प्रेरणा वाडी यांच्या चारोळ्यांचे पुस्तक “चित्ररंग काव्यसंग” यांचे प्रकाशन झाले. त्यानंतर मनमंथन सन्मान व विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. बालकलाकार स्वराज राजे सोसे याचाही सत्कार करण्यात आला.निवेदन शुभांगी तिवारी, मंजुषा विश्वेकर, अर्चना गिरगावकर, व मीरा घोंगे यांचे होते. आभार प्रदर्शन अलका टिकेकर यांचे होते.
दुपारी स्वरूची भोज आणि त्यानंतर साहित्य कट्टा अंतर्गत काव्यवाचन, कथाकथन, स्वगत, नाट्यअभिवाचन इत्यादी सादरीकरण झाले. साहित्य कट्ट्याचे अध्यक्ष डॉ.सुनीलराव देशपांडे होते व प्रमुख पाहुणे विष्णूपंत पांडे व चंद्रकांत तुंगार होते. निवेदन शुभदा साधू व रश्मी देवगडे यांचे होते. आभार प्रदर्शन स्मिता रेखडे यांचे होते.सायंकाळी चहापानानंतर चतुर्थ सत्रात विविध कला दर्शन यात साहित्यिकांनी इतरही नृत्य, गायन, अभिनय इत्यादी कलांचे प्रदर्शन घडविले. चतुर्थ सत्रात अध्यक्ष श्री चंद्रकांत जुन्नरकर व प्रमुख पाहुणे मोहन घोंगे व श्री माधव गिरगांवकर होते सभासदांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रात्री स्वरूची भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.षष्टम सत्रात तारखेला सकाळी जड अंतकरणाने परंतु आनंद भरून घेत एकमेकांचा हृद्य निरोप घेण्यात आला आणि समारंभाची सांगता झाली. लॉकडाऊनच्या काळात स्थापन केलेल्या या छोट्याशा रोपट्याने केवळ पाच वर्षात आपल्या फांद्या अवघ्या महाराष्ट्रभर पसरवल्या आहेत. आणि आजही अनेक साहित्यिक त्यांना जुळत आहेत. हा आलेख उत्तरोत्तर चढत जावा हीच सदिच्छा प्रत्येक पाहुण्याने प्रकट केली.
संस्थापिका संचालिका प्रेरणा प्रदीप वाडी यांच्यासोबतच उपसंचालिका वंदना विष्णू पांडे. स्वागताध्यक्ष रश्मी कुलकर्णी उपस्वागताध्यक्ष मंजुषा विश्वेकर संमेलन प्रमुख प्रतिमा तुंगार, उपसंमेलन प्रमुख अलका टिकेकर, सचिव मीरा घोंगे, उपसचिव रेखा भिवगडे, कोषाध्यक्ष विनोद मुळे, उपकोषाध्यक्ष प्रीती दीक्षित, ग्राफिक्सकार प्रदीप वाडी यांसोबतच सर्वच सभासदांचा व संदीप कुलकर्णी चंद्रकांत तुंगार श्रीकांत विश्वेकर यांचाही हातभार होता.कार्यक्रमाला पुणे,मुंबई,सातारा,कल्याण, अमरावती,अकोला, हिंगणघाट,नागपूर इत्यादी ठिकाणाहून साहित्यिक हजर होते.कार्यक्रमाचे कौतुक आलेले सर्वजण करत आहे.