या धम्म वाणीचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायक संगीतकार ‘पावा’ यांचा आवाज म्युझिकल कार्यक्रमातून येत्या २६ फेब्रुवारी २०२५ रोजी,सायं-७ ते ९ या वेळेत दादर शिवाजी मंदिर नाट्यगृहात गुंजणार आहे.
या धम्मजागृतीच्या संगीतमय धम्म गीतांचा कार्यक्रम *निब्बान न्यूज मीडिया संचालित दैनिक सार्वभौम राष्ट्र* च्या वतीने आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमास आपण आणि आपल्या मित्र परिवाराने डोनेशन पास बुकिंग करून कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे संगीतकार गीतकार *पावा* यांचा कार्यक्रम मुंबई येथे बऱ्याच कालावधीनंतर होत आहे.अशा कार्यक्रमास आपण प्रोत्साहित करून धम्मजागृतीस पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.
मा.संपादक प्रेमरत्न चौकेकर सर यांनी आपल्या सर्वांसाठी सुरू केलेले “दैनिक सार्वभौम राष्ट्र” हे वर्तमानपत्र चढत्या आलेखाने अविरत यशस्वी व्हावे यासाठी आपण तन-मन आणि धनाने प्रोत्साहन देऊन सामाजिक भान जपावे.कारण आजच्या स्थितीत ती काळाची गरज आहे. आणि म्हणूनच दैनिक सार्वभौम राष्ट्र या डिजिटल वृत्तपत्राचे प्रिंट मीडियाद्वारे नियमित वितरण व्हावे याकरिता ‘पावा’ च्या लाईव्ह म्युझिकल शोचे आयोजन केले आहे, याकरिता आपण पास बुकिंग त्वरित करून आपल्या मित्र-मैत्रिणींना ही कळवावे आणि आपल्या सामाजिक योगदानासाठी एकमेकांना प्रोत्साहित करावे.
धम्म म्हणजे काय?
यावर अनेक वक्त्यांच्या भाषणातून, पुस्तकाच्या रूपातून आपल्याला वाचायला-ऐकायला मिळते,विविध माध्यमातून आपण ऐकतही असतो परंतु ‘पावा यांच्या संबुध्दा’ नावाच्या अल्बम ने गीत,संगीत आणि गाण्याच्या अर्थपूर्ण शुद्ध मधुर वाणीने करोडो जनतेला धम्माचे बोधमृत देण्याचे सर्वोत्तम काम केलं आहे. जगप्रसिद्ध गीतकार-संगीतकार ‘पावा’ यांचा जन्म रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे सारख्या अत्यंत दुर्गम गावामध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत झाले.
त्यानंतर भाग शाळा खंडाळा वाटद या ठिकाणी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षणाबरोबरच लहानपणापासूनच त्यांना कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राची फार आवड. शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घेणारे ‘पावा’ इयत्ता दहावी नंतर मुंबई येथे तंत्रज्ञान – व्यावसायिक शिक्षणासाठी आले. तसेच पुढे मुंबईमध्ये काम करत असताना आंबेडकरी चळवळीचा जलसा आणि त्यामधील प्रबोधनी गीते गायनाची आवड पावा यांनी कायम ठेवली होती.
जलसा सारख्या प्रबोधनी कार्यक्रमात लहानपणापासूनच एक कॉमेडी कलाकार म्हणून प्रसिद्ध होते, विविध सामाजिक प्रसंग तसेच इतर प्रसंग घेऊन त्यामधून तसेच महामानवांच्या गीतांमधून समाजप्रबोधन कायम ठेवायचे. कॉमडीयन म्हणून ही त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांचे वडीलही सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात कायम असायचे. कवी- गायक इ.डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणापासूनच त्यांच्यावर आंबेडकरी जलशाचा प्रभाव पडल्याने त्यांनी त्याच क्षेत्रात लक्ष केंद्रित करून प्रभावीपणे प्रगती केली.
आज प्रगतीच्या क्षेत्रात यशस्वी शिखरावर असताना जलसा हीच माझी प्रेरणा आहे,असे पावा ने अनेकदा जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.त्यांनी लेखणीसह संगीतबद्ध केलेली आणि आपल्या मधुर संयमी आवाजात आजरामर पद्धतीने गायलेली पाली मराठी आणि इतर विविध भाषेचा वापर करून धम्मगीतांना जागतिक दर्जा प्राप्त केला.’पावा’ च्या प्रत्येक गीतातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, प्रत्येक गीत ऐकतांना आपण धम्म विचारात जुळले जातो.
आज अनेक ठिकाणी लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेचे व्हिडिओ तयार करताना पावा ने गायलेल्या जय मंगल अष्टगाथेचा वापर मोठया प्रमाणात केला जातो.मला त्यांची सर्वच गीते खूप आवडतात. अगदी एकांतात शांत बसून ऐकतच राहावे असं वाटते. आणि हे मलाच नव्हे असे अनेकांना वाटते हे सत्य आहे.
आपल्याला ही हा अनुभव लाईव्ह अनुभवायला २६ फेब्रुवारी २०२५ ला दादर छ. शिवाजी नाट्य मंदिर येथे सर्वोत्तम आनंद मिळणार आहे.आपण आपल्या परिवारासह त्वरित पास बुकिंग करा आणि आपली उपस्थिती नक्की करा.
✍️- अमित जयवंत कांबळे
मु. विल्ये,जि.रत्नागिरी.
मो. ९८९२४१६८१३.