कला शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक

कळझोंडी शाळा नंबर – 2 गाणसुरवाडी येथे छ.शिवाजी महाराज जयंती साजरी

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कळझोंडी नंबर – 2 येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत सदस्या वेदिका निंबरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम फडकले यांच्या प्रमुख उपस्थित तर मुख्याध्यापक जयदीप यादव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.

यावेळी विचारमंचावर प्रशाळेचे मुख्याध्यापक जयदीप यादव,पदवीधर शिक्षिका गिरमकर,शिक्षिका सौ.यादव,श्री.मुर्ले,तुकाराम फडकले आदी मान्यवर उपस्थित होते. 

 कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ – वाजता थोर राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुकीने प्रभातफेरी काडण्यात आली यावेळी शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.त्यानंतर शालेय सभागृहात अभिवादन सभा घेण्यात आली या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार व दीपप्रज्वलन ग्रामपंचायत सदस्या वेदिका निंबरे, ईश्वरी निंबरे माधवी निंबरे,रिया निंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर अभिवादन सभेत शालेय निवडक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे जिवन कार्य आपल्या शब्दात व्यक्त केले.त्यानंतर प्रशाळेतील शिक्षक श्री.मुर्ले, सौ.यादव, पदवीधर शिक्षिका गिरमकर व प्रशाळेचे मुख्याध्यापक जयदीप जादव यांनी शिवरायांच्या इतिहासाचा मागोवा घेत विज्ञानवादी राजे,बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देऊन खऱ्या अर्थाने जातीनिरपेक्ष,धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था निर्माण करणारे निधर्मी राजे यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केला.

 सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यार्थी मंत्रीमंडळ,सर्व विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समिती,पालकवर्ग शिक्षकवर्ग यांनी मेहनत घेतली.शेवटी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related posts

“बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे.या निंदनीय घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो.

kalaranjan news

स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला काॅलनीतील विद्यार्थ्यांनी साकारले सुंदर गणपती

kalaranjan news

पवित्रता, जीवन की बनाये रखना यही धम्म है!

kalaranjan news