आपल्या अभिनय कलेने व हजरजबाबी स्वभावाने सर्वांची मने जिंकणारे बालकलाकार चि.अद्विक सोसे आणि स्वराज सोसे या दोघांना चि.अव्दिक याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त पोस्टमास्टर तथा कलाकार अभय कुलट यांनी पोष्ट आँफिसची अद्विक व स्वराजची छायाचित्रे असलेले पोस्टाचे ‘माय स्टॅम्प’ च्या रूपाने दिलेली भेट ही सुरेख भेट आहे,असे गौरवोद्गार बुलडाणा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग-जाधव यांनी काढले.
त्या बालकलाकार अद्विक व स्वराज सोसे यांना वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेल्या पोस्टाच्या तिकिटाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होत्या.यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,पूर्वी काही गणमान्य विभूतींनाच पोस्टाच्या तिकिटांवर छायाचित्र घेऊन हा मान मिळायचा,पण भारत सरकारने माय स्टँम्पच्या माध्यमातून सुरु केलेला हा उपक्रम खूपच कौतुकास्पद असून अद्विक आणि स्वराज यांची छायाचित्रे पौस्टाच्या तिकिटाच्या स्वरुपात बघतांना होणारा आनंद अवर्णनीय असाच आहे.अद्विक आणि स्वराज यांच्या चित्रफिती व त्यांच्या यशस्वीतेच्या बातम्या मी नेहमी बघत,वाचत असल्याने मला या दोघांचेही खूप कौतुक असून मला हे दोघेही विशेषत्वाने आवडतात,असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी दीपाली सोसे यांचा शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी प्रा.दीपाली सोसे,अद्विक आणि स्वराज या तिघांचाही सत्कार केला,हे विशेष.यावेळी प्रख्यात लेखिका प्रा.दीपाली सोसे,साहित्यिक आतिश सोसे प्रामुख्याने उपस्थित होते.