शिवनेरी गडावर जन्माला आला
आई जिजाऊं ना हर्ष फार झाला
शिवाई देवीचा तो शिवाजी अवतरला
गनिमाचा तो कर्दनकाळ ठरला
जय जय हो जय शिवराया
आम्हावर असू द्यावी तुमच्या कृपेची छाया ||
बालपणी मावळ्या समवेत
तोरणागड तो स्वराज्यात आणला
पहिला भगवा गगनी राजे तुम्ही फडकविला
जय जय हो जय शिवराया ||
गनिमी कावा तुमचा हो प्रसिध्द
आई जिजाऊ अन् भवानी मातेचा होता तुम्हावर वरदहस्त
अफझलखान भेटीस होता उतावीळ मनी त्याचे होते कपट फार
प्रताप गडावर झाला मोठा प्रताप अफझलखान केला तुम्ही ठार
जय जय हो जय शिवराया ||
शाहिस्तखान स्वराज्यावर चालून आला
अन्याय अत्याचार त्याने चालविला
राजे तेव्हा तुम्हीच त्यावर हल्ला चढवला
कापलेली बोटे घेऊन शाहिस्त नावाचा सैतान पळाला
जय जय हो जय शिवराया ||
तानाजी मालुसरे ,बाजीप्रभू देशपांडे , येसाजी कंक
राजे तुमचे होते सारे मित्र जिवलग
स्वराज्यासाठी लढले कित्येक मावळे
मित्रत्वाचे घ्यावेत तुमच्या इतिहासापासून धडे
जय जय हो जय शिवराया ||
परस्त्रीचा आदर नेहमीच केला
स्त्रियांच्या रक्षणास उभे तुम्ही झाला
प्रत्येक आई बहिणीचा राजे आपण सन्मान केला
जय जय हो जय शिवराया ||
शिवभक्त गजानन पोटे करतो रयतेस विनंती
शिवचरित्र वाचावे घरोघरी
जपावी आपण शिवरायांची संस्कृती
छत्रपती शिवराय असावे प्रत्येक घरी|
जय जय हो जय शिवराया ||
गजानन दशरथ पोटे
दहिहांडा (अकोला)
9923208775