प्रतिनिधी /अमित कांबळे
रत्नागिरी मधील सुप्रसिद्ध व्याख्याते तसेच आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक सी. ए. जाधव सर यांची सुकन्या सोनाली चंद्रकांत जाधव हिने चेन्नईत झालेल्या ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५ चा ‘किताब’पटकावल्याने सोनाली आणि तिच्या मार्गदर्शक परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोनाली जाधव हिने,२०१६ मध्ये हवाई सुंदरी होण्याचा मान प्राप्त केला.गेल्या सात वर्षापासून ती यशस्वी भरारी घेत असतानाच तिने नुकत्याच एक सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता, आणि त्या स्पर्धेत तिने सर्वोत्तम यश प्राप्त करून सोनालीने “मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५” चा किताब पटकावत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सोनाली जाधव यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी मिडीयम मध्ये झाले, तर बारावीपर्यंत शिक्षण रत्नागिरीमध्ये झाले. त्यानंतर दिल्ली येथून हवाई प्रशिक्षण पूर्ण करून चेन्नईमध्ये विमानतळावर हवाई सुंदरी म्हणून एका आंतरराष्ट्रीय कंपनी सेवेत तिची निवड झाली.लहानपणापासून आपण हवाई सुंदरी व्हायचं असे तिथे स्वप्न होते आणि ते स्वप्न पूर्ण केले,शिवाय चेन्नईत मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५ चा किताबही पटकावला. तिच्या या सर्वोत्तम यशस्वी वाटचालीबद्दल सोनाली जाधव आणि तिचे मार्गर्शक आई – वडिल यांच्यावर महाराष्ट्रातून अभिनंदना चा वर्षाव होत आहे.