प्रतिनिधी /अमित कांबळे
विरार मनवेल पाडा येथे संत सेवालाल महाराज बंजारा प्रतिष्ठान तर्फे महान क्रांतिकारक संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स कार्यक्रम आयोजित केले होते. जयंतीचा हा विशेष कार्यक्रम मा. प्रशांत राऊत सर (बहुजन विकास आघाडी चे नेते) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
तसेच या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष विलास चव्हाण, दत्ताराम जाधव उपाध्यक्ष – हिम्मत राठोड, राजकुमार जाधव, विजय राठोड, खजिनदार- नितीन पवार, एकनाथ सोनार, गोपाळ राठोड, लक्ष्मण जाधव, उपखजिनदार – रमेश राठोड, सुभाष राठोड, प्रवीण चव्हाण, धनराज आडे अरुण पवार,दीपक पवार तसेच विशेष कार्यकर्ते विजय जाधव, विनोद जाधव, सचिन राठोड रुपेश चव्हाण, सुनील चव्हाण प्रदीप राठोड, अमोल जाधव, दीपक पवार, अश्विन पवार आणि मोठ्या संख्येने महिला मंडळ बहुसंख्येने सदस्य उपस्थित होते.गोड प्रसादीच्या वाटपानंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली.