१४ फेब्रुवारी हा दिवस मातृ पितृ पूजन दिवस म्हणून घरोघरी साजरा केला जावा, असे आवाहन मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आवाहन केले आहे.आपल्या संस्कृती मधील काही पारंपरिक रिती आपण पाळल्या पाहिजेत, नवीन पिढीने या रिती जतन कराव्यात,यांचे महत्त्व जाणून घ्यावे, रामायण मध्ये याचे महत्त्व सांगितले आहे.
गणेशजी ने आपले आईवडील शंकर पार्वती यांचे मातृ पितृ पूजन करीत असे, असे केल्याने आपणास मोक्ष प्राप्त होतो असे ही मानलें जाते. १४ फेब्रुवारी ला प्रेम संदेश दिवस ,मोहकसुंदर अभिनेत्री मधुबाला जन्म दिवस मानला जातो.माझ्या घरी व माझ्या जवळच्या नातेवाईक घरी मातृ पितृ पूजन दिवस साजरा केला.” असे भारत कवितके यांनी सांगितले.