स्थळ- वेदशस्रोतेजक हॉल, सदाशिव पेठ.
विश्वगुरू मा. डॉ. मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठतर्फे वसुधा इंटरनॅशनलच्या सौ.वसुधा वैभव नाईक यांना ‘ आंतरराष्ट्रीय जीवन गौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. डॉ. राजेश्वर हेंद्रे सर होते. ते पोलीस मित्र, युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय संघटक आहेत. डॉक्टर मधुसूदन घाणेकर ब्रह्म ध्यान विश्वपीठ, वसुधा इंटरनॅशनल, युवा क्रांती संघटना या तीनही संघटनांनी मिळून यावेळी काव्य संमेलन भरवलेले होते.
काव्य संमेलनामध्ये एकूण वीस कवींचा सहभाग होता.सर्व कवींनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकले. प्रत्येक कवीची कविता वेगळी होती. सुरेख शब्दाने कविता सजलेली होती. विश्वगुरू डॉ.घाणेकर यांनी आपल्या भाषणातून सौ.वसुधा नाईक यांच्या दैदीप्यमान कार्याच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला.” सौ.वसुधा नाईक वंचित बालांचे विश्व उजळवण्यासाठी मौलिक
योगदान देत आहेत.फुटपाथ वरील शाळेतील बालांना आणि त्यांच्या पालकांना सातत्याने दिलासा देत आहेत. यथाशक्य आर्थिक सहकार्यही करतात.वंचित महिलांना समूपदेशनातून त्यांच्यासाठी सबलीकरणाचेही कार्य करीत आहेत. वसुधा नाईक म्हणजे हे एक महिला सबलीकरणाचे पर्वच आहे.महिला विश्वकल्याणासाठी सौ.वसुधा नाईक यांनी ध्यासच घेतला आहे.
सौ.वसुधा नाईक यांनी आपल्या भाषणातून स्वतःचा विकास करत समाजाचाही विकास कसा करत आहेत हे सांगितले. आपले बालपण कसे गेले हे सांगितले. डिजिटल युगात टिकायचे तर नवे तंत्रज्ञान शिकले पाहिजे असेही म्हणाल्या. त्यांची ‘ सुखाच्या सरी ‘ ही कविता वाचताना त्या खूप भावुक झाल्या होत्या.शाळेत शिक्षिकेची भूमिका बजावतानाच जीवनात यशस्वी कसे व्हायचे याचे आत्मज्ञान प्राप्त झाले “असे त्या म्हणाल्या.या पुरस्काराबद्दल सकारात्मक कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रम्हध्यान विश्वपीठाच्या निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी बहारदार केले.कोमल नाईक, शीतल शर्मा,योगेश हरणे, गौरव पुंडे आणि दीपराणी गोसावी यांनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले.या कार्यक्रमास युवाक्रांती फाऊंडेशनचे पदाधिकारी, अमर पठारे,मोहिनी पठारे,भारत पंजाबी, उर्मिल मेहता, वर्षा नाईक,दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष गोरख अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते.