ह्रदयी बहरला वसंत
मनी छेडले सूर प्रीतीचे
भोवताली ऐकू येई गीत
लागले या जीवा वेड प्रेमाचे ||
सप्तरंग जीवनात खुलले
प्रेमात हे मन गुंतले
प्रेम रंगात हे जग रंगले
जेव्हा वेड प्रेमाचे लागले ||
फुलपाखरु सभोवताली उडती
गंध फुलांचा तो दरवळत राहे
ह्रदयी अलगुज वाजती
जशी चांदणी चंद्रास पाहे ||
वेड लागता प्रेमाचे
जसे उमलने फुलाचे
मनी सुर छेडती गीतांचे
प्रेम करी नंदनवन जीवनाचे ||
कवी-गजानन दशरथ पोटे
अकोला
9923208775