कला कविता काव्य नाट्य पुरस्कार सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक

१६ फेब्रुवारी रोजी हातकणंगले येथे २२ व्या छ.शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन

हातकणंगले प्रतिनिधी

रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २५ रोजी सकाळी ८ वाजता अंबप ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अंबप आणि कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय २२ वे छ. शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .संमेलन अध्यक्ष म्हणून साहित्यिक मा. तानाजी आसबे सर वाळवे खुर्द हे भूषवणार आहेत. तर उद्घाटक मा. प्रा. सागर बगाडे सर असून प्रमुख पाहुणे कांदबरीकार लेखक दि .बा .पाटील कामेरी व प्रमुख अतिथी कु. आशू मेश्राम सिनेअभिनेत्री गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८.३० वाजता ग्रंथ दिंडी असून त्यांचे उद्घाटन सौ. दिप्ती विकासराव माने सरपंच ग्रामपंचायत अंबप यांच्या हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पुजन मा बी टी पाटील विवेक वाचनालय अध्यक्ष यांचे हस्ते होणार असून मा. काकासो पाटील, मा डॉ . बी के पाटील, मा विजयसिंह माने, मा राजवर्धन पाटील, बी के माने सर, मा. राजेंद्र माने सर यांची उपस्थिती असणार आहे. स्वागताध्यक्ष मा. महादेव बापू डोंगरे तर प्रास्ताविक मा. तुकाराम भाऊसो निलजे करणार आहेत.

उद्घाटन सत्रात पत्रकार कवि सरकार यांच्या स्वलिखित काव्यसंग्रह व संपादित संमेलन विशेषांक तसेच माजी सैनिक लेखक कवि अशोक मोहिते बार्शी यांच्या काव्य जागर काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दिक्षित दक्षिण मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

दुपारी सौ स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि कांदबरीकार डॉ श्रीकांत पाटील घुणकी ‘ यांची मुलाखात होणार आहे. मनोहर भोसले टाकळी, सौ आरती लाटणे इचलकरंजीी, कु प्रतिभा बामणे परिते हे घेणार आहेत . तिसऱ्या सत्रात कविसंमेलन मा. प्रा. डॉ. सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गडहिंग्लज यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. अशोक मोहिते, बार्शी दिपक पवार सर रुकडी, काशिनाथ आव्हाड अहिल्यानगर, डॉ कवी मधूकर हुजरे धाराशिव, कवि सागर साठे संगमनेर यांची उपस्थिती असणार आहे .

तसेच त्याचप्रमाणे कविसंमेलन साठी कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बेळगाव, सातारा, गारगोटी,  गडहिंग्लज, धाराशिव, छ .संभाजी नगर ,पुणे, सातारा आदी जिल्ह्यातील कवि, कवयित्री सहभागी होणार आहेत . साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचनालय अंबप सर्व संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत. असे कवि सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

 

Related posts

श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विकासक आनंद मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

kalaranjan news

साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान 2024

kalaranjan news

मा. कु. सायली बाळू ढेबे यांना महाराष्ट्र स्टार गौरव पुरस्कार प्रदान

kalaranjan news