अरूण काकड –
अकोट : युवा कवी व लेखक विशाल कुलट यांना विश्व समता कलामंच लोवले ता. संगमेश्वर, जि रत्नागिरी या संस्थेतर्फे २०२५ चा राज्यस्तरीय युवा प्रेरणारत्न पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शुभगंधा मंगल कार्यालय संगमेश्वर येथे गौरविण्यात आले.
विशाल कुलट गेल्या अनेक वर्षांपासून कवी व लेखक म्हणून सतत शेतमाती, परखड , वास्तव व इतर अनेक विषयाला घात घालत लिखाण करत असतात. ज्येष्ठ कवी विठ्ठल कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा साहित्य संघासोबत वाटचाल करीत आहेत.
यापूर्वी अनेक पारितोषिके व पुरस्कार विशाल कुलट यांना मिळाले आहेत. या सोबतच मानाचा राज्यस्तरीय युवा प्रेरणारत्न पुरस्काराने विशाल कुलट यांना गौरविण्यात आले.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यंदा पुरस्कारचे १९ वे वर्ष होते असे विश्व समता कलामंचाचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांनी कळविले.