कलर्स मराठी या टिव्ही चॅनेल वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत अमरावतीचा यश अनिल वाकळे मार्तंड ही भूमिका साकारतो. यश ने या मालिकेत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. यशचे संवाद थेट ह्रदयात शिरतात, त्याचे नैसर्गिक अभिनय कौशल्य या मालिकेतून दिसून येते.
यश या आधी झी टिव्ही मराठी वरील ड्रामा ज्युनियर्स या रियालिटी शो मध्ये टाॅप सिक्स मध्ये होतो. तसेच बर्याच राज्यस्तरीय बालनाट्य व युवानाट्यात उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. तसेच मराठी चित्रपट, शाॅर्टफिल्म, व्हिडिओ साॅग, टिव्ही जाहीराती, फॅशन शो इत्यादी मध्ये उल्लेखनिय कामगिरी केली आहे. यश आज अमरावतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चमकवत आहे. त्याच्या भविष्यातील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.