अकोला(दि.११):
येथील दहा वर्षे वयाचा गोड व हरहुन्नरी बालकलाकार,बालवक्ता चि.स्वराज दीपाली आतिश सोसे याची नुकतीच बुलडाणा फिल्म सोसायटीच्या वतीने सन्मानपूर्वक दिल्या जाणार्या ‘राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार-२०२५’ करिता आणि सुलक्ष्मी बहुद्देशीय संस्था तथा माणूसकी समूह,छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने गौरवपूर्वक दिल्या जाणार्या ‘राज्यस्तरीय सेवागौरव पुरस्कार-२०२५’ अशा दोन प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवड झाली असून दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी बुलढाणा येथे व लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे या दोन मानाच्या पुरस्काराने स्वराजला समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार असल्याचे बुलढाणा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर आणि सुलक्ष्मी संस्थेचे अध्यक्ष सुमीत पंडित यांनी निवडपत्राव्दारे कळविले आहे.
चि.स्वराज याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीपर ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ हा लघुचित्रपट व ‘बाप्पा मोरया’ या गाण्याच्या झालेल्या अल्बममध्ये “प्रमुख बालकलाकार’ म्हणून तसेच ‘पर्यावरणपूरक दीपोत्सव’ या ध्वनीचित्रफितीमध्ये आणि वयाच्या दिड वर्षायासून रंगभूमीवर आपल्या सहज व बोलक्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेत पर्यावरण जनजागृतीसाठीही त्याने मोलाचे काम केले आहे.
स्वराजने यापूर्वी तीन जाहिराती,चार हिंदी,मराठी व वर्हाडी बोलीभाषेतील लघुचित्रपटांमध्ये तसेच महाराष्ट्र,दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यात रंगभूमीवर उत्कृष्ट अभिनय व प्रभावी भाषणाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.सीबीएसई व आयसीएसई शाळांमध्ये क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या ध्वनीचित्रफितीमध्येही त्याने अप्रतिम अभिनय केला आहे.
स्वराजला आजवर भाषणकला व अभिनय कौशल्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संलग्नित ‘टॅलेंट कट्टा’ या संस्थेचा ‘इंडियन टॅलेंट राष्ट्रीय पुरस्कार,पुणे,इंटरनॅशनल रिल्स फिल्म फेस्टिवलचा बालकलाकार पुरस्कार,औरंगाबाद,विदर्भ केसरी भूषण पुरस्कार,दर्यापूर,कोंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बालकलाकार पुरस्कार,उत्तरप्रदेश गुणवंत बालकलाकार पुरस्कार,अकोल;शुभम बालकलाकार पुरस्कार,पनवेल;नवरत्न बालकलाकार पुरस्कार,सांगली; अभिनय संस्था पुरस्कार,बुलढाणा,चित्रपटमहर्षी स्व.डॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव बालकलाकार पुरस्कार,अकोला,राज्यस्तरीय बालप्रतिभा पुरस्कार,धुळे,राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार,नाशिक,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विशेष अतिथी सन्मान,खामगाव इत्यादी अनेक मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वात आनंदाची बाब म्हणजे ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’या लघुचित्रपटातील प्रमुख बालकलाकाराच्या अप्रतिम भुमिकेसाठी आणि पर्यावरण जागृतीसाठी घेतलेल्या पुढाकारासाठी म्हणून भारत सरकारच्या “राष्ट्रीय बाल पुरस्कार”करिता २०२३-२४ ला नाॅमिनेशन मिळाले होते,ही गौरवाची बाब आहे.स्वराजच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.