नाशिक येथील वसुंधरा संस्थांचे नाशिक स्किल हबच्या बँकिंग अँड फायनान्स प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एस.टी. कॉलनी शाखेत क्षेत्र भेट झाली.क्षेत्रभेटी दरम्यान संस्थेचे संचालक डॉ.दिपक आहेर यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी विषयी आव्हान केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी बँकिंग क्षेत्रातील संधी व प्रत्यक्ष कामकाजा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी वाचन व संवाद कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. जगातील आर्थिक विकास व देशातील तेजी मंदी या घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी दैनंदिन वृत्तपत्रातील वाचनातून केला पाहिजे. विद्यार्थीवर्गाने किमान वृत्तपत्रातील विशेष अर्थशास्त्र या पानाचे वाचन केले पाहिजे; तसेच त्यातून अवलोकन केले पाहिजे.
स्पर्धेच्या जगात वावरण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैविधिक गुण असले पाहिजे. त्यातून आपले कौशल्य विकसित केले पाहिजे. अशाप्रकारे राकेश मेहर यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख इंजि.जयवंत नलावडे, प्रा.राजू रसाळ, प्रशिक्षक अर्जुन मेकाले व प्रशिक्षणार्थी विद्यार्थीवर्ग उपस्थीत होते.