अमित कांबळे /प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील मौजे विल्ये बौद्धजन कमिटी,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, तसेच मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ, आणि मानका आप्पा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई आंबेडकर आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची संयुक्त जयंती कार्यक्रम आयु. मेघा सुवेज कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सदर कार्यक्रम दानशूर मानका आप्पा कांबळे समाजरत्न पुरस्कार प्राप्त आयु. जयराम धाकू कांबळे यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळाच्या उपाध्यक्षा आयु. अनिता जयवंत कांबळे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्थानिक कमेटीचे अध्यक्ष राहुल कांबळे यांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर धम्म पूजापाठ घेण्यात आले.
त्यानंतर माता रमाई आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनपटावर आयु. चंद्रकांत कांबळे, राहुल कांबळे, नरेश कांबळे,आयु.विधी कांबळे, कु. आराध्या कांबळे, कु. विराज कांबळे, आयु. सुवेज कांबळे, मेघा कांबळे, मीना विजय कांबळे इत्यादीनी मार्गदर्शन करून समाज प्रबोधन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय प्रभावीपणे नरेश तुकाराम कांबळे यांनी केले.येणारे प्रत्येक कार्यक्रम सर्वानुमते रूपरेषेत आणि दर्जेदारयुक्त साजरे करण्यासाठी साठी अविरत प्रयत्न हवेत असे मत सूत्रसंचालन करताना नरेश कांबळे यांनी व्यक्त केले.