अमित कांबळे/प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील कळझोँडी बौद्धजन पंचायत समिती व सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 127वी जयंती प्रबोधनी उपक्रमातून साजरी करण्यात आली.महिला मंडळाच्या अध्यक्ष नलिनी दिनेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पंचशील बुद्ध विहार येथे जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी विचार मंचावर बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष अनिल पवार, तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, कळझोँडी शाखेचे उपाध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, सल्लागार किशोर पवार, ऑडिटर संगम पवार, माजी ऑडिटर विशाल पवार त्याचबरोबर महिला मंडळाच्या अध्यक्षा नलिनी पवार, उपाध्यक्ष संपदा पवार, सेक्रेटरी रीना पवार सह सेक्रेटरी करुणा पवार, सभापती नम्रता पवार, खजिनदार नंदिनी पवार, बौद्धाचार्य दीक्षा पवार त्याचबरोबर शाखेतील सभासद महिला युवक युवती उपस्थित होत्या.प्रारंभी महामानव भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमाना उपस्थित मान्यवर पदाधिकारी महिला पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आला.
त्यानंतर क्रांतीज ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ या नामफलकाचे अनावरण तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर धार्मिक पूजा पाठ बौद्धाचार्य दीक्षा पवार आयु प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला त्यानंतर बुद्ध विहाराच्या सभागृहात रमाई आंबेडकर अभिवादन सभा नलिनी दिनेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेत कुमारी स्वरा सुहास पवार, परी संगम पवार, सुप्रिया सुभाष पवार, सुशांत सुभाष पवार, ऐश्वर्या प्रवीण पवार, नम्रता सिद्धार्थ पवार, शुभांगी प्रकाश पवार, संपदा सुभाष पवार, करुणा किशोर पवार, करीना मंगेश पवार, अंतरा निशांत राऊत, रुद्र निशांत राऊत, मिरज नितीन पवार, विहान निशांत राऊत श्रावणी उमेश पवार, सांची संगम पवार, शितल बाळकृष्ण जाधव आदींनी रमाई यांच्या जीवनावर आधारित मनोगते व गीत गायन केले.
शाखेचे अध्यक्ष अनिल पवार, तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, सेक्रेटरी सुभाष पवार दीक्षा पवार यांनीही आपल्या मनोगतातून रमाबाई यांचे जीवन कार्य पटवून दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा नलिनी पवार यांनी रमाबाई यांच्या कुटुंबातील आला की चे जीवन मृत्यू सत्र दुःख त्याग समजूतदारपणा कारुण्य उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजेच रमाई रमाईच्या आदर्श कष्टमय जीवनाचा महिलांनी आदर्श घेऊन भविष्यात वाटचाल केल्यास आपली प्रगती आहे असे गौरव उद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला सेक्रेटरी रीना पवार तर उपस्थित मान्यवर व क्ते गायक यांचे आभार जनरल सेक्रेटरी सुभाष पवार यांनी मानले शेवटी शरणेत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.