काव्ययोग काव्य संस्था तसेच वसुधा इंटरनॅशनल पोलिस मित्र संघटना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वंचिताबरोबर साजरी करूया दिवाळी’ तसेच पुण्यातील नामवंत कवींचे ‘कवी संमेलन’ आयोजित केले होते.’एक क्षण आनंदाचा’ सामाजिक संस्था अप्पर इंदिरानगर,पुणे येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधूसुदन घाणेकर एकपात्री कलाकार तसेच प्रमुख पाहुणे राजेश्वर हेंद्रे राष्ट्रीय सल्लागार युवा क्रांती पोलीस मित्र संघटना,शहाजी जगताप पोलीस मित्र तसेच वसुधा इंटरनॅशनच्या संस्थापिका सौ.वसुधा ताई नाईक या वेळी उपस्थित होते.यात मुलांना कविता कश्या असतात त्या कश्या सादर करायच्या या साठी नामवंत कवींचे ‘काव्य संमेलन’ घेण्यात आले.
त्यात शुभांगी पाटील,सारिका बनसोडे,विजय सातपुते,विवेक करंजीकर,कविता काळे,सारिका सासवडे,शरदचंद्र काकडे,राम सर्वगोड ह्या सर्व कवींनी आपल्या कवितेने मुलांना मंत्र मुग्ध केले.ज्यांना कोणी नाही त्यांना काही देण्याचे काम करावे. जेणेकरून आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळतो.सामाजिक कार्य हातून घडते.म्हणून ही कल्पना सौ.वसुधा नाईक यांनी आपल्या सहकार्यातून वंचित मुलांसाठी दिवाळी फराळ,खाऊ,शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही निराळाच होता.ज्यातून आपल्याला समाधान मिळते तेच कार्य करणे गरजेचे असते. असे मनोगत वसुधा नाईक यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सायली ढेबे यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन गौरव पुंडे यांनी केले.तसेच आभार काव्ययोग काव्य संस्थेचे अध्यक्ष यांनी योगेश हरणे यांनी केले.