बाळासाहेब वाकचौरे, नाशिक
नाशिक येथील श्रीरामकुंज सोसायटीत असलेल्या, श्रीराम मंदिरात आज दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी “श्रीरामकुंज फाउंडेशन च्या वतीने” गोवर्धन पूजा एवं अन्नकुट महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
या गोवर्धन पूजा एवं अन्नकुट महोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम मंदिरात श्रीराम कुंज फाउंडेशन च्या वतीने महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी मंदिरात सकाळपासून आरती, भजन असे दिवसभर कार्यक्रम चालू होते. आणि संध्याकाळी पंगतीच्या- पंगती बसून भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेत होती. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला
गोवर्धन पूजेचा दिवस मानतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण गोकुळ वाशी यांना घेऊन गोवर्धन पर्वताची पूजा केली होती.