उमरगा येथील समाज विकास संस्था,आणि कनिक फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वतीने पालावर राहणाऱ्या मुलांसाठी दिवाळी साजरी व्हावी,त्या मुलांच्या पालावर जाऊन ती साजरी व्हावी.किमान सणाच्या दिवशी तरी त्याना सन्मानाने जीवन जगता यावं गोड दोन घास खाता यावेत.हा विचार घेऊन समाज विकास संस्थेच्या वतीने गेली दहा वर्षापासून पालावर दीपावली साजरी केली जाते.आज श्रमजीवी कॉलेजच्या बाजूला असणारी पालं या ठिकाणी दीपावली साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भूमिपुत्र वाघ हे बोलत असताना म्हणाले की, पालावरच्या माणसाचं जीवन आजही बहिष्कृत असल्यासारखेचं आहे.त्यांना राहायला घर नाही.जागा नाही.आरोग्य आणि शिक्षण मिळत नाही. अशा वंचित लोकांचं दर्शन समाजाला घडावं. म्हणून हा उपक्रम जाणून बुजून घेतला जातो. सरकारचं याकडे लक्ष जावं. वंचितांच्या घटकासाठी अजून काम करण्याची गरज असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केली.याप्रसंगी,अनाथाची माय विद्याताई वाघ, इंजिनियर आकाश सूर्यवंशी,प्रो.निकिता (वाघ)सूर्यवंशी,मॉर्निंग वॉक चे सभासद रामभाऊ, महाराष्ट्र लोकविकास मंच आणि समाज विकास संस्थेचे कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ,अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस च्या फिल्ड ऑफिसर आपसाना मुल्ला यांनी बाळ गोपाळांना पोटभर गोडधोड खाऊ घालून दिवाळी साजरी केली.