आरोग्य क्रीडा सामाजिक

कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा ची विजयाची परंपरा कायम 

श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिप प्राप्त करून विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या स्पर्धेमध्ये बीए भाग 1 चा विद्यार्थी अनुराग मौर्या यांनी 55 किलो वजन गटातून सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच बीए भाग १चा विद्यार्थी कार्तिक मिश्रा यांनी 67 किलो वजन गटातून सुवर्णपदक प्राप्त केले.

महाविद्यालयाने सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिप प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण अळसड, सचिव घनश्याम मेश्राम, संचालक सुरेश मुंधडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील आखरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उमेश राठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related posts

वीरशैव विचारांना समर्पित ‘कालांतर’ या दिनदर्शिकेचा दि.३ नोव्हेंबर भाऊबिजेला साखरखेर्डा येथे भव्य प्रकाशन सोहळा

kalaranjan news

अनिकेत सेवाभावी संस्थेत दिवाळी उत्साहात साजरी

kalaranjan news

“अमरावतीत रुद्राक्ष संस्थेच्या दहीहंडी उत्सवाने रंगवली गोकुळाष्टमी, सुरम्य सांस्कृतिक प्रदर्शनाने आनंदाची लहर”

kalaranjan news