भारत कवितके मुंबई कांदिवली, पश्चिम
सालाबादप्रमाणे याही वर्षी कांदिवली येथे धनगर समाज विकास मंडळा तर्फे धनगर समाज बांधवांचे स्नेहसंमेलन व वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाचे संस्थापक सदस्य व प्रवक्ते भारत कवितके यांनी प्रसारमाध्यमांना कळविले आहे.रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी वाजा ज्ञाती युवक मंडळ सभागृह, इराणी वाडी रोड नंबर १ ,धनामल शाळेसमोर कांदिवली पश्चिम मुंबई ६७ या ठिकाणी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत धनगर समाज बांधवांचे स्नेहसंमेलन व वधू वर परिचय मेळावा होणार आहे.
मंडळाच्या अनेक समाज उपयोगी योजना राबविण्यात येणार आहेत, १० वी १२वी नंतर कोणती दिशा निवडायची यावर मान्यवरांचे मार्गदर्शन, समाज एकत्र करून समाज बांधवांची आर्थिक, शैक्षणिक प्रगती साधणे,या कार्यक्रमात मंडळाची स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल, वधू वर परिचय मेळावा ,पालकांचा सहभाग, लहान थोरांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शन,व शेवटी स्नेह भोजन अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे.वधूवर नोंदणी व जाहिरात स्विकारण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे.मंडळाचे माजी पदाधिकारी व संस्थापक सदस्य मल्हारी लाळगे, संतोष पिसे, आप्पासाहेब कुचेकर, सदानंद लाळगे, आनंदा भोजणे, प्रवक्ते भारत कवितके, रावसाहेब चांगण, आदी मंडळास मार्गदर्शन करीत आहेत.
तर मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, कार्याध्यक्ष सुनील भगत, उपाध्याय महेंद्र काळे, सचीव नारायण पिसे,सह सचिव विजय कुचेकर, खजिनदार मनोज पिसे, सह खजिनदार भूषण एकल, आणि मंडळाचे सदस्य सागर पिसे, संतोष पिसे, मधुकर कुचेकर, सतिश पिसे, दत्तात्रय वणवे, उदय बरगडे,बाळू पिसे, राजेश कुचेकर, अजित चांगण, संजय धालपे आदी विशेष परिश्रम घेत आहेत.