अथश्री बावधन कंडोमिनियम जेष्ठ नागरिक रहिवासी संकुलामध्ये दिवाळीनिमित्त दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले. सर्व संकुलांमधील आजी आजोबांची म्हणजेच अथश्रीकारांची दिवाळी सुरेल करण्यासाठी अभंग, नाट्यसंगीत, व उपशास्त्रीय गायनाद्वारे हा संगीताचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक मा. श्री. केदार केळकर व त्यांचे साथीदार यांनी सृश्राव्य संगीत सादर करून संपूर्ण वातावरण सुरमय केले.
या सुरेल अश्या मैफिलीचा आस्वाद सर्व अथश्रीकरांनी घेऊन दिवाळी सणाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात ९२ वर्षापर्यंतच्या सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. याच दिवाळी सणाच्या निमित्ताने ह्या ज्येष्ठ नागरिक रहिवासी संकुलामध्ये जेष्ठ नागरिकांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या आकाश कंदीलामुळे सर्व अथश्री तेजोमय झाली. भव्य दिव्य स्वागत कक्षातील संस्कार भारती रांगोळी आकर्षक ठरली. सुरेल गायन कार्यक्रमानंतर फराळाचेही आयोजन केले होते . अथश्रीतील सर्व रहिवाशांनी मनसोक्त आनंद लुटला. ही सर्व माहिती सामाजिक बहुउद्देशीय संस्था व कलारंजन न्यूज प्रतिनिधी सायली बाळू ढेबे यांनी घेतली.