दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्ल्ड व्हिजन मुंबई संस्थेचे संस्थापक आणि वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबईचे संपादक नागेश हुलवळे आणि सह संपादिका सौ नीलम शेलटे यांनी मराठी राजभाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून साहित्य दैनिकाच्या निर्मिती सोबत या वर्षी “पसायदान” या नावाचा पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई तर्फे आणि वर्ल्ड व्हिजन टाईम्स हे साहित्य दैनिक कवी, लेखक साहित्यिक यांच्या लेखणीला चालना देण्यासाठी सदर दिवाळी अकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतूरकर, ज्येष्ठ साहित्यिका लीला गाजरे, जेष्ठ कवयित्री शैलाताई गिरनाकर, ठाणे भुषण डॉ. स्व नारायण तांबे स्तंभ लेखिका पुरस्कर प्राप्त सौ. सावित्री ताई झांबरे यांच्या शुभ हस्ते ठाणे येथे साध्या पद्धतीने करण्यात आले.
याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे,ओतूरकर तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिका मा. श्रीमती. लीलाताई गाजरे, जेष्ठ कवयित्री सौ. शैलाताई गिरनारकर, सुप्रसिद्ध स्तंभ लेखिका सौ. सावित्री ताई झांबरे, कवयित्री सौ. शशिकला ताई कुंभार, संपादक प्रा. नागेश हुलवळे, श्री. दिगंबर गिरणारकर, तानाजीराव झांबरे सर, सौ. उषा हुलवळे, सई हुलवळे, मयुरेश शेलटे आणि सह संपादिका सौ नीलम शेलटे हे मान्यवर उपस्थित होते.
सदर दिवाळी अंक राजसा प्रकाशन उल्हासनगर ठाणे यांनी प्रकाशित केला आहे .सूत्र संचालन सौ. नीलम शेलटे यांनी केले आणि सर्वांनी पसायदान म्हणून झाल्यावर प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली. अशी माहिती राजेश साबळे,ओतूरकर उल्हासनगर ठाणे यांनी दिली आहे.