सामाजिक साहित्यिक

समाजाचे वास्तवी चित्र, ऍड. रमेश उमरगे

रमेश उमरगे यांचा जन्म 1955 मध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मामाकडे महादेव विद्यालय धनेगाव येथे घेतले आणि महाविद्यालयीन शिक्षण उदयगिरी कॉलेज उदगीर येथे घेतले. M. U. M. U  महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर रमेश उमरगे महाराष्ट्र पोलीस सेवेत रुजू झाले.

पोलीस सेवेत असताना रमेश उमरगे यांनी विविध विभागात विविध पदावर आपले कर्तव्य पार पाडले. त्यातील महत्वाचे विभाग म्हणजे पासपोर्ट विभाग आणि सी. आय. डी.पोलीस सेवेत असताना चिंचवड येथे यांनी कौटुंबिक समुपदेशक म्हणून काम केले विशेष म्हणजे पोलीस सेवेत असतानाच त्यांनी सिम्बॉयसिस कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली.त्यांना बढती मिळत गेली आणि 2013 मध्ये ते गुप्तवार्ता अधिकारी बनले आणि मग निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर ऍडव्होकेट रमेश उमरगे यांनी बालन्यायालयात (ज्युव्हेनाईल कोर्ट) सेवा दिली. पुण्यात मेट्रो प्रोजेक्टवर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून दोन वर्षे सेवा दिली, एका लॉ फार्म मध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून काम केले. हे करत असतानाच त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी) ची पदवी मिळवली!

सध्या ते राष्ट्रीय लोक अदालत शिवाजीनगर (पुणे) येथे पॅनल न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.ते एक साहित्यिक आहेत, कवी आहेत. त्यांचे ‘यह रंग है निराला’ हे आत्मचरित्र वाचकप्रिय झालेले आहे. हिंदी-उर्दू शेर शायरीवर त्यांचे प्रभुत्व आहे.

● विश्वकल्याण मानव सेवा संस्था देहूकडून जगतगुरु संत तुकाराम महाराज जीवन गौरव पुरस्कार

● पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली कडून सन्मानपत्र

● भाग्योदय लेखणीचा या साहित्य मंचाकडून राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार

● मन्मथ माउली या संस्थेकडून जीवन गौरव पुरस्कार

अशा प्रकारे अनेकानेक पुरस्कार त्यांना प्रदान झाले आहेत.

Related posts

कला रंजन न्यूजतर्फे महाराष्ट्रातील कवींसाठी दिवाळीनिमित्त सुवर्णसंधी व काव्यस्पर्धेचे आयोजन

kalaranjan news

वंचितांबरोबर साजरी केली दिवाळी

kalaranjan news

मा. गणपतराव तथा आप्पासाहेब बालवडकर यांना ‘भारत सम्मान’ पुरस्कार प्रदान

kalaranjan news