अकोला:
येथील मागील सात वर्षांपासून अभिनय गुरुवर्य तथा प्रख्यात लेखिका प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र,अकोला’या संस्थेच्या सुमारे एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, तमिळ ,तेलुगु, चित्रपट, मालिका, जाहिराती, लघुचित्रपट, वेबसिरीज,रंगभूमीच्या माध्यमातून सुरेख संधी मिळून विद्यार्थी कलाकारांनी आपले एक स्वतंत्र स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे.
नुकत्याच दिल्ली येथे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय,संगीत नाटक अकादमीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय नृत्य ंमहोत्सव-२०२४मध्ये अकोला येथील ‘आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमी,अकोला’ च्या ग्लॅमरस विद्यार्थीनी तथा हरहुन्नरी कलाकार कु.जागृती खुरपे आणि कु.तनिष्का ब्राम्हणवाडे या दोघींना दि.१६ ते २१ आॅक्टोबर या सहा दिवस प्रत्येक सत्रात पंधरा देशांमधील गणमान्य विभूतींसोबत सहभागी होण्याची व ज्ञान संपादन करण्याची संधी प्राप्त झाली.
या महोत्सवामध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड,भारताचे सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत,केंद्रिय राज्यमंत्री सुरेश गोपी,जगप्रसिध्द कलाकार डाॅ.सोनल मानसिंग,डाॅ.संध्या पुरेचा,डाॅ.पद्मा सुब्रमन्यम,प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी,अभिनेत्री अर्चना जोगळेकर,डाॅ.नंदकिशोर कपोते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. दिल्ली येथे सर्व व्यवस्था व सुविधेसह मान्यवरांसोबत ऐकण्याची,शिकण्याची व सहभागी होण्याची जी अविस्मरणीय संधी आणि दोन महिन्यात एक राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार,अभिनयाचे अप्रतिम शिक्षण,मौलिक मार्गदर्शन आम्हा दोघींनाही प्राप्त झाली,ती केवळ गुरुवर्य प्रा.दीपाली सोसे यांच्यामुळेच.’गुरु’ प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचे आहेत,अशी भावना जागृती आणि तनिष्का यांनी यावेळी व्यक्त केली.