चांदवड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक अत्यंत हालाकीचे जीवन जगत आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय व कौटुंबिक दृष्ट्या दुर्लक्षित झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या उन्नत जीवनासाठी विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करताना नाशिक जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे (फेसकॉम) उपाध्यक्ष प्रा. निकम टी पी. चांदवड तालुक्यात बारा गावांमध्ये नव्याने स्थापन केलेल्या ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते. ज्येष्ठांचे कायदेशीर अधिकार व हक्क या विषयी प्रबोधन करण्यात आले. प्रत्येक गावात सभा व कार्यक्रम घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे एक सुंदर स्वतःचे कार्यालय आसन व्यवस्था असावी त्या संदर्भात नियोजन करण्यात आले.
तालुक्यातील ज्येष्ठांना स्वतंत्र ओळखपत्र देण्याचे ठरले. सभेसाठी चांदवड तालुक्याचे अध्यक्ष शंकरराव निखाडे हरसुलचे अध्यक्ष गोपीनाथ खैरे, पाट्याचे अध्यक्ष ठोके, काळखोडेचे अध्यक्ष नारायण शेळके, साळसाण्याचे अध्यक्ष जोंधळे नाना, तिसगावचे अध्यक्ष शिवाजीराव निकम, वडनेरचे अध्यक्ष रामकृष्ण जमदडे,पाथरशेंब्याचे अध्यक्ष राजाराम ठाकरे, दिघवद, बोपाण्याचे अध्यक्ष निखाडे असे विविध गावांचे अध्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी जन आरोग्य योजनेच्या नासिक जिल्हा तक्रार निवारण समितीवर प्रा निकम टी पी यांची नेमणूक झाली म्हणून तालुक्यातील सर्व अध्यक्षांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.