लेखक तानाजी धरणे लिखित हेलपाटा या बहुचर्चित कादंबरीला अल्पावधीतच 18 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.धृपद एन्टरटेनमेंट व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तीनशेहून अधिक साहित्यकृतीतून या हेलपाटा कादंबरीची लक्षवेधी पुरस्कारासाठी तज्ञ परीक्षक समितीने निवड केली.शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व राेख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी,लेखक, गीतकार श्री.प्रविण दवणे सर होते. प्रमुख पाहुणे लेखिका नीता शरत् कुमार माडगूळकर,अध्यक्ष,मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे विद्याधर ठाणेकर,अध्यक्ष,मराठी एकीकरण समिती,गाेवर्धन देशमुख,संदीप पाचंगे,जनार्दन म्हात्रे,गाेडसे मॅडम यांच्या हस्ते हा पुरस्कार लेखक तानाजी धरणे यांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.
डाॅ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,ठाणे या ठिकाणी साहित्यवलय पुरस्कार -२०२४ ने त्यांना सन्मानित करण्यात आले.धृपद एन्टरटेनमेंटचे सर्वेसर्वा व सुप्रसिद्ध कवी ऋग्वेद देशपांडे व साै.पूजा ऋग्वेद देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर व शिस्तबद्ध नियोजन केले.लेखक तानाजी धरणे यांच्या या साहित्यिक वाटचालीबद्दल श्री. त्यांचे मिञमंडळ यांनी व साहित्यिक सचिन बेंडभर , लेखक शेखर फराटे, लेखक श्री . कुंडलिक कदम , मा .श्री . राहुल चातुर, मा . श्री परदेशी सर, श्री . राजेंद्र साञस भाऊसाहेब, श्री.पिंगळे सर पञकार झी मिडिया, मा बालरोगतज्ञ डाॅ. चंद्रशेखर दाभाडकर , ज्येष्ठ कवी मा. औश्री सुरेश मेहता सर( ठाणे) सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधु व भगिनी यांनी अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या.