अत्यंत जीवघेण्या अशा आजारातून नुकत्याच बाहेर पडलेल्या रुग्ण रसिकासाठी आंतराष्ट्रीय कीर्तिचे गायक आणि विश्वजोडो अभियानचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी त्यांचा ‘यादे ‘हा जुन्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम निरपेक्षपणे सादर करुन , त्यास दिलासा दिला. पं.भीमसेन जोशी तसेच पंकज मलिक, लता दीदी,आशाजी,सुरैय्या, नूरजहाॅ, तलत रफी,किशोरकुमार, मुकेश, हेमंतकुमार, मन्नाडे,अन्वर महेन्द्रकपूर, तसेच विष्णू साळुंके, आदि 18 गायक.गायिकांची गाणी सादर केली.
डाॅ.मधुसूदन घाणेकर हे1965 पासून देशविदेशात विश्वजोडो अभियान अंतर्गत गाणी सादर करतात. गाण्यासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून, गाण्यासंदर्भात अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत. डाॅ.घाणेकर स्वतः गीतकार, संगीतकारही आहेत. रफी जन्मशताब्दी पुरस्कार तसेच किशोरकुमार, मुकेश,तलत,हेमंतकुमार आदि गायकांच्या नावेही सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
एक व्यंग चित्रकार, आर. के. लक्ष्मण प्रसिद्ध व्यंगचित्रकार यांच्या जयंती निमित्त डॉ. मधुसूदन घाणेकर यांचे कौतुक करण्यात आले.