शुभांगी दिनेश पाटील, पुणे प्रतिनिधी
१४,१५,१६ ऑक्टोबर २०२४ या तीन दिवसीय परमपूज्य स्वामी विद्यानंद जन्म शताब्दी सोहळा, पुणे येथील वडकी या गावी दिव्य जीवन वाटिका आश्रम येथील तेजोमय हाॅल येथे साजरा करण्यात आला .
रत्नागिरी पावस येथील परमहंस स्वामी स्वरूपानंद यांचे अनुग्रहित शिष्य तसेच ज्यांना स्वामी स्वरूपानंद व स्वामी अमलानंद यांनी परमपूज्य स्वामी विद्यानंद यांना सद्गुरू स्थानी विराजमान करण्यात आलेले परमपूज्य स्वामी विद्यानंद याचे हे ऑक्टोबर २०२३ ते २०२४ जन्म शताब्दी वर्ष दिव्य जीवन वाटिका आश्रम येथे विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आले. तसेच कोजागिरी पौर्णिमेला त्यांचा शंभरावा जन्मदिवस तीन दिवसीय सत्रात भव्य दिव्य स्वरूपात संजीवन सोहळा साजरा करण्यात आला.
सर्व साधकांचे स्वागत करून कार्यक्रमाला गणेश वंदना, संध्याक्रम प्रवचन आदीला केंद्रस्थानी ठेऊन अत्यंत योजकतेने केलेली सर्व कार्यक्रमाची अप्रतिम आखणी व त्याची काटेकोर तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आली. कार्यक्रमाकरिता घेतलेले सोयीचे वातानुकूलित स्वतंत्र असे प्रशस्त मंगलकार्यालय वडकी येथील तेजोमय, दिव्य जीवन वाटिका आश्रम, सासवड दिवे घाट रोड, हडपसर,पुणे घेतले.
त्यांतील सर्वच कार्यक्रमातील विविधता नावीन्यता, अभिनवता, न्रुत्य, गायन इत्यादीचे सुंदर सुयोग्य कलाविष्कार आनंदाने बहरलेला होता. मन ईश्वराकडे सतत धाव घेत होते. स्वामींच्या काव्यग्रंथांवर आधारित उत्कृष्ठ निरूपण अभंग गायन व त्यांचे अल्बम प्रकाशन, ब्रम्हनाद, डॉक्युमेंटरीने गाठलेला कळस अध्याय होता. अभ्यागतांची उस्फूर्त समयोचित मार्मिक मनोगते ऐकण्यास मिळाली. अधिकारी व्यक्तीकडून झालेले जन्मशताब्दी गौरव ग्रंथ विशेषांकाचे समयोचित प्रकाशन सुंदर रितीने झाले.
उत्तम ध्वनी आणि द्रुक श्राव्य व्यवस्था स्वानंद व धनश्रीने केले होते व सूत्र संचालन ही अप्रतिम केले. सर्व वयोगटांतील व सर्व ठिकाणांहून आलेल्या गुरूबंधु भगिनी यांची आवर्जून मोठ्याप्रमाणावर उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही उपस्थिती नक्की च परमपूज्य स्वामी विद्यानंद यांच्या आंतरीक आनंदाला उभारी देत असावी. असे सर्वे साधक मनोभावे उपस्थित होते. सतत स्वामीजींचे स्मरणात साधना करणारे साधक उपस्थित होते.
आश्रम ते कार्यालय जलद ने आण करण्याकरता असलेली रिक्षा व्यवस्था ही वयोवृद्ध साधकांना सुलभ सुखकर होती. आश्रमातील इतर सर्व चोख व्यवस्था विशेषतः समाधीची सुंदर फुलांनी दररोज होत असलेली सजावट विलोभनीय व परम आनंद देत होती. उअत्तम गोडधोड विविधांगी खान पान व सुटसुटीत शिस्तबद्ध प्रेमपूर्वक वितरण व्यवस्था म्हणजे खरोखर सर्वे नियोजकांचे कौतुकास्पद कार्य दिसत होते. एकूणच शांत, प्रसन्न, खेळीमेळीचे पण शिस्तीचे आश्रमीय अत्यंत पवित्र वातावरण आनंद देत होते व सर्वांची सोय राखण्यात गुंतलेले अनेक कार्यकर्ते व त्यांच्या सूचनांना प्रतिसाद देणारे सर्व लोक हाच स्वामीजींनी मार्गस्थ केलेला सुसंवाद पदोपदी जाणवत होता.
सुंदर, कलापूर्ण छापला गेलेला प्रकाशित जन्मशताब्दी विशेषांकाचे लगोलग मोफत वितरण करण्यात आले व प्रसाद भेट म्हणून सर्व साधकांना दिले. सर्व कार्यक्रमांचे दूरस्थ नेट वर प्रक्षेपण युट्युब लाईव्ह देण्यात आले. कार्यक्रमाला योगदान देणाऱ्यांचा उचित गौरव ही करण्यात आला. या सर्वांमुळे प. पू. स्वामींचा जन्मशताब्दी सोहळा अतिशय उच्च कोटीचा आनंद देणारा व चिरकाल संस्मरणीय झाला. यांत आज फक्त स्वामी सदेह नाहीत हेच काय ते शल्य !
स्वामी आज ही आश्रमात चित् स्वरूपात आहेत हे प्रत्येक क्षणाक्षणाला, साधनांमधून जाणवत होते. ही प्रेरणा त्यांचीच असल्याची आपली ठळक जाणीव होत होती.कित्येक दिवस अविरत कष्ट घेणाऱ्या अर्थात् तन मन धनाने झटणाऱ्या सेवा मंडळाचे तसेच इतरही अनेक दृश्य अदृश्य सर्व मंडळींचे कौतुक तर शब्दातीत ! मात्र अशी सुसंधी अनेकांना प्राप्त करून दिल्याबद्दल अंतःकरणपूर्वक पुनश्च सर्वांचे अनंत आभार .🙏🏻🙏🏻💐💐