नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय ,भोसरी ,पुणे ३९ च्या वतीने दरवर्षी मराठी साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या दिवाळी अंकांचा सन्मान करण्याचे आयोजन केले जाते. या १९ व्या वर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संपादकांनी २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती पुढील पत्त्यावर पाठवाव्यात. स्पर्धा विनामूल्य आहे. कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी स्वागत मूल्य घेतले जात नाही.
संपादकांनी आपल्या दोन दिवाळी अंकांच्या प्रति पुढील पत्यावर पाठविणे.
प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे, संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष
नक्षत्राचं देणं काव्यमंच साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरी पुणे -४११०३९
पाठवण्याची अंतिम मुदत नाही. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक दिवाळी अंकांना फोर कलर सन्मानपत्र देण्यात येईल. विजेत्यांना समारंभपूर्वक सन्मानचिन्ह, गौरव पत्र, पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठित असलेली ही दिवाळी अंक स्पर्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या दिवाळी अंकांना उत्तम प्रतिसाद दरवर्षी दिला जातो. यावर्षी सुद्धा संपादकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन, या स्पर्धेला यशस्वी करावे. अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कवी वादळकार,पुणे यांनी कळविलेले आहे.