कलारंजन न्यूज बहुउद्देशीय सामाजिक विचार मंच आयोजित दिवाळीनिमित्त काव्य लेखन स्पर्धा राबवण्यात आली आहे. कवींच्या गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांचा दृढ आत्मविश्वास वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 22 आक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपली कविता पाठवावी . या स्पर्धेत दिवाळी सण,भाऊबीज, फराळाची परिपूर्णता, पूजन लक्ष्मीचे, पाडवा प्रतीक प्रेमाचे हे पाच विषय दिले असून आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावरील कविता आयोजकांकडे नियम व अटी ग्राह्य धरून पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ह्या राबवण्यात आलेल्या स्पर्धेत स्पर्धकांची कविता ही कलारंजन न्यूज पोर्टलवर कविता पब्लिश केल्या जातील व तसेच स्पर्धकांचे फोटो सोबत यूट्यूबलाही प्रसारित केल्या जातील. सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र मिळणारच आहेत परंतु ही सुवर्णसंधी प्रत्येकासाठी या दिवाळीत आत्मविश्वास बळकट करण्यासाठी उपयोगी ठरेल अशी कला रंजन ला आशा आहे. तसेच प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानितही करण्यात येणार आहे.
कलारंजन च्या ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी 92271998299 या नंबर वर संपर्क साधावा. नोंदणी शुल्क 199/- रुपये 9146288502 या नंबर वर पाठवून आपला प्रवेश निश्चित करून kalaranjannews99@gmail.com या ईमेलवर आपली कविता पाठवावी. स्पर्धेतील नियम व अटींसाठी 92271998299 या नंबर वर संपर्कही करू शकता व सर्व निर्णय हे कलारंजन न्यूज कडे राहतील ह्याची स्पर्धेकांनी नोंद घ्यावी. कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक घटकांना सविस्तरपणे मांडण्याचे कार्य कलारंजन आपल्या माध्यमातून करत असून हे एक हक्काचे व्यासपीठ कवींना उपलब्ध करून दिले आहे कृपया या संधीचा स्पर्धकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन कला रंजन न्यूज करत आहे