कवी सरकार इंगळी
रविवार, दिनांक २० ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता परिते भोगावती साखर कारखाना जवळ श्री दत्त मंदिरात कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय २० मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुऱ्हाडे गडहिंग्लज अध्यक्ष शिवराज कॉलेज हे होते. तर उद्घाटन श्री गजानन बजरंग सातपुते वाशी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजन श्री. साताप्पा विठ्ठल चौगुले यांचे हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे कांदबरीकार डॉ. श्रीकांत पाटील घुणकी कवी मधुकर हुजरे नंदाताई लाड यांनी दिपप्रज्वलन केले. संमेलनात दिपावली विशेषांकाचे प्रकाशन प्रसिद्ध मान्यवरांंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री पांडुरंग मोरे मोहडे, बाजीराव पाटील भोगावती हे उपथित ॲकॅडमीचे शिक्षक सागर पाटील, पांडूरंग मोरे सर व बाजीराव पाटील भोगावती, अशोक सुर्यवंशी, संजय धोंडीराम पाटील, अशोक मोहिते बार्शी, दिपक पवार रुकडी, आनंदराव चरापले सर उपस्थित होते.
संमेलन अध्यक्ष प्रा. किसनराव कुऱ्हाडे, डॉ श्रीकांत पाटील यांनी आपल्या भाषणात साहित्यातील विविध पैलू कशा निर्माण करायवयाच्या, या विषयी व साहित्य संमेलन हे समाजप्रबोधन व समाजपरिर्वत घडवणेचे व्यासपीठ आहे, असे सांगितले.
त्याचप्रमाणे कविसंमेलन अध्यक्ष कवी डॉ. मधुकर हुजरे धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. यात सोलापूर ‘ धाराशिव गडहिंग्लज ‘ भोगावती परिसरातील अनेक कवी आणि कवियत्री व कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध भागांतून कवी- कवियत्री सहभागी झाले होते. तिसऱ्या सत्रात श्री सदानंदगिरी महाराज मठाधिपती श्री. प.पू . स्वामी गगनगिरी महाराज ट्रस्ट बुरंबाळी यांचे हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेे. स्वागत पुजा शेलार आवळी यांनी व सुत्रसंचालन कु. प्रतिभा बामणे आणि दिपक पवार सर रुकडी यांनी केले. मयूर प्रभू इंगळी यांनी आभर मानले, असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.