पुणे प्रतिनिधी, शुभांगी पाटील
आज आपण पुण्यातील गुरूकुल एज्युकेशन फाऊंडेशनच्या सह संस्थापिका,तसेच पुणे जिल्हा महिला आघाडी पोलिस पाटील संघांच्या कार्यकारी अध्यक्षा सौ.शारदा विनोद दातीर पाटील यांच्या सामाजिक कार्याविषयी ओळख करून घेणार आहोत. तसेच त्या Blooming buds nursery school,Balaji nagar, Pune चा संचालिका / मुख्याध्यापिका आहेत.
त्यांचे सामाजिक कार्य म्हणजे गुरूकुल एज्युकेशन फाऊंडेशन मुळशी २०१४ पासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. मुळशी तालुक्यातील सुमारे १८ गावातील आदिवासी कातकरी बंधू भगिनींसाठी तसेच तेथील लहान मुलांसाठी “माणुसकीची आनंद कुटी” या संकल्पनेतून त्या कार्य करतात. आदिवासी समाजाचा विकास हा उद्देश समोर ठेवून त्या विविध उपक्रम करतात.त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया.
कातकरी लोकांच्या सतत संपर्कात रहाणे, स्वच्छते विषयी जागृरूकता, शिक्षणविषयक, आरोग्य विषयक मार्गदर्शन, दारूबंदी साठी प्रबोधन, विवाह संदर्भात प्रबोधन, कन्या दान अन्नदान उपक्रम, विविध सणांमधे सहभाग, त्या स्वतः आदिवासी कातकरी भगिनींसोबत सहभाग घेतात.
तसेच हा आदिवासी विभाग समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या सतत अविरत प्रयत्न करत असतात. शहरातील विविध उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतात. प्रेरणा श्रावण सोहळा, लोकमत ‘ती’ च्या गणपतीची भेट, आदिवासी लोकांना आरतीचा मान दिला जातो. आदिवासी लोकांमधे स्टेज डेअरिंग यावी म्हणून फॅशन शो,नृत्य, कलागुणांना वाव दिला जातो सिने कलाकारांसोबत पुण्यात पहिल्यांदा “बाई पण भारी” “देवा” हा चित्रपटगृहांमध्ये पाहण्याचा पहिल्यांदा आनंद लुटला. आदिवासी कातकरी लोकांना दिवाळी फराळ वाटप, कपडे वाटप, सुगंधी साबण, उटणे, शॅम्पू , तेल, प्रसाधनांचे वाटप केले जाते. दिवे, रांगोळी,आकाशकंदील देऊन मुलांमधे विविध स्पर्धा ठेवल्या जातात किल्ले बनवणे,दिवाळीची सजावट तसेच जादूचे प्रयोग, झुंबा डान्स, मनोरंजनात्मक खेळ घेतात.
आदिवासी समाजाचे जीवनमान कसे उंचावता येईल, त्यासाठी रोजगार संधी उपलब्ध करून देणे, महिला बचत गटाची माहिती देणे, शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, सार्वजनिक लाईट व्यवस्था , शौचालय,रस्ते, स्नानगृह,घरांवर प्रत्रे टाकणे,हे संपूर्ण कामकाज श्री विनोद ज्ञानदेव दातीर व प्रेरणा द मोटिव्हेशन गृपचा संस्थापिका सौ.शारदा विनोद दातीर हे दाम्पत्य संपूर्ण कामकाज सांभाळतात. त्या महिलांमधील आनंद, आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणा देणं यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात.
सौ.शारदा विनोद दातीर यांच्या ह्या कौतुकास्पद कार्याचा आढावा कला रंजन न्यूज चॅनेल च्या पुणे जिल्हा प्रतिनिधी सौ. शुभांगी पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. तसेच माणुसकीच्या आनंद कुटीला व मा. सौ शारदा विनोद दातीर पाटील यांच्य पुढील वाटचालीला कला रंजन चॅनेलकडून भरभरून शुभेच्छा. त्यांचे कार्य सदैव असेच बहरोत राहो || दिवाळीच्या आनंदी शुभेच्छा!!