विदर्भातील ओम वैष्णवी वन्नेरे फिल्म प्राॅडक्शन निर्मित ‘काटा’या मराठी चित्रपटासाठी नुकत्याच अकोला येथे ‘आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमीमध्ये झालेल्या कलाकारांच्या आॅडिशनमध्ये ‘आनंदी गुरुकुल’च्या सहा विद्यार्थी कलाकारांची निवड झाली असून त्यामध्ये प्रमुख बालकलाकाराच्या भुमिकेत स्वराज सोसे तर शिवांश भिरड,अद्विक सोसे,अनिरुध्द जळगावकर,सानवी लंगोटे,समर्थ वाघमारे यांची निवड झाली असल्याचे आॅडिशननंतर चित्रपटाचे निर्माते कैलाश वन्नेरे यांनी सांगितले आहे.
नुकत्याच ‘काटा’या चित्रपटाचे तिसर्या फेरीतील सर्वांसाठी खुल्या स्वरुपातील आॅडिशन आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अॅकॅडमीमध्ये झाले.त्यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन व पुजन प्रसिध्द अभिनय गुरु प्रा.दीपाली सोसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी निर्माते कैलाश वन्नेरे,दिग्दर्शक वैष्णवी वन्नेरे,श्रीकांत पोतदार,संभाजीनगर,कल्याण ससाणे,अहमदनगर,भरत घावटे-पुणे,डिओपी प्रविण मिसाळ,नेवासा यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
या चित्रपटाच्या आॅडिशनकरिता नाशिक, अकोला, बुलढणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, नागपूर या जिल्ह्यातून कलाकारांनी उपस्थिती लावली होती.या चित्रपटात प्रमुख भुमिकेत प्रसिध्द अभिनेत्री केतकी माटेगावकर तर प्रमुख बालकलाकाराच्या भुमिकेत प्रसिध्द बालकलाकार चि,स्वराज सोसे लक्षवेधी भुमिका साकारणार आहेत.या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारी महिन्यात सुरु होणार असून मध्यप्रदेश,खान्देश,विदर्भामध्ये या भागात होईल,अशी माहिती निर्माते कैलाश वन्नेरे यांनी दिली आहे.