प्रत्येक महिलेचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे लोकमत सखी मंच. आपल्या मनातल्या गुजगोष्टी इथे बोलायच्या आणि आपले कलागुण निर्भीडपणे सादर करायचे. असे व्यासपीठ स्वर्गीय भाभीजी ज्योत्स्ना दर्डा यांनी लावलेलं हे छोटंसं रोपटं. आज संपूर्ण महाराष्ट्रात सखी मंच ह एक फुललेला वटवृक्ष झाला आहे. या सखी मंचाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील रांगोळी आर्टिस्ट माधुरी सुधा यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
लोकमत सखी मंचाचे ‘लोकमत सखी’ च्या नवीन लोगो च्या फलकाचे अनावरण या दरम्यान करण्यात आले. लोकमतचे आवृत्तीप्रमुख गजानन चोपडे व वितरण विभाग प्रमुख रवींद्र खांडे व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.