प्रतिनिधी – मुंबई, भारत कवितके
श्रीरामपूर येथील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम हॉटेल चंद्रानी श्रीरामपूर जि. अहमदनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे. जुन्या पिढीतील लोककलावंत पै.मजनुभाई शेख हे नाट्यकलावंत, उत्कृष्ट हार्मोनियमवादक,गौळणरचित्रकार तसेच उत्कृष्ट गायक होते. त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी दोस्ती फाउंडेशनतर्फे सदर पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांस प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाते.
यावेळी कला,क्रीडा,साहित्य,वैद्यकीय,शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींस पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कृत व्यक्तीस आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, आणि स्नेहवस्त्र देऊन अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. असे दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष रज्जाकभाई शेख, नितीन गायके,नसीर सय्यद, देविदास बुधवंत, सत्तारभाई शेख,आनंदा साळवे,इमाम सय्यद,अमोलभाऊ शिंदे,मिराबक्ष बागवान, राजेंद्र देसाई आदी सदस्यांनी केले आहे.
दोस्ती फाउंडेशनचे पुरस्कार क्रीडारत्न पुरस्कार नाना डोंगरे निमगाव वाघा,पत्रकाररत्न राजु लहिरे मनमाड,भारत कवितके मुंबई, गुणवंत शिक्षक सीमा गायकवाड वाशिम,गौतम गायकवाड संगमनेर,स्वाती पुरी नगर, समाजरत्न- पांडुरंग रोडगे गोंडेगावं, काव्यप्रतिभा पुरस्कार संदीप वाकडे कन्नड, सुभाष उमरकर नाशिक, सीमाराणी बागुल नांदगाव, सरोज आल्हाट,अण्णासाहेब मोहन श्रीरामपूर,आबा पांचाळ वसमत, अहेमद पिरनसाब शेख परभणी, गुणवंत पर्यवेक्षिका पुरस्कार सुजाता गायकवाड नगर,नवदिग्दर्शक पुरस्कार प्रमोद सूर्यवंशी मुंबई यांना जाहीर झाला आहे.
हॉटेल चंद्रानी श्रीरामपूरच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा व काव्यसंमेलन होणार आहे. असे दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष रज्जाकभाई शेख, सचीव आनंदा साळवे,लोकरंग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मीराबक्ष शेख, सामाजिक कार्यकर्ते फ्रँसिस संसारे, नशीर सय्यद, प्रकाशक नितीन गायके, राजेंद्र देसाई आदींनी कळवले आहे.