कला पुरस्कार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक

मा. कु. सायली बाळू ढेबे यांना महाराष्ट्र स्टार गौरव पुरस्कार प्रदान

विद्यानिकेतन सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र स्टार गौरव पुरस्कार २०२४ या मा. कु. सायली ढेबे यांना प्रदान करण्यात आला. विद्यानिकेतन संस्थेचे वरिष्ठ मंडळी तसेच डॉ. अशोक नगरकर सर ( ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पुणे) मा. भिडेवाडाकार विजय अभिमान वडवेराव ( आयोजक भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान ), मा. सौ. प्रियांका शिंदे ( सिने अभिनेत्री ), मा. श्री. संतोष नलावडे ( सिने अभिनेते ) व इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सायली ढेबे यांचे सामाजिक,कला रंजन न्युज चॅनेलची पत्रकारिता, साहित्य, कलाक्षेत्र, शैक्षणिक या क्षेत्रांतील त्यांची कामगिरी पाहता महाराष्ट्र स्टार गौरव पुरस्कार २०२४ च्या त्या मानकरी ठरल्या. हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे पार पडला. यावेळी त्यांचे आई-वडील बाळू ढेबे व संगीता ढेबे देखील आपल्या कन्येच्या पुरस्कारासाठी उपस्थित होते. विद्यानिकेतन सोशल फाउंडेशन (VSVSS) चे व इतर मान्यवर उपस्थित असलेल्या मंडळींचे कार्य कामकाज हे बहुमोलाचे ठरले तसेच संपूर्ण सोहळा उत्कृष्टपणे संपन्न झाला.

 

Related posts

इंद्रजीत पाटील अक्षरसागर पुरस्काराने सन्मानित

kalaranjan news

फोफसंडी येथे नक्षत्र पाऊस काव्यसहल उत्साहात संपन्न

kalaranjan news

माननीय गंगाधर धुवाधपारे यांना समाजरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान बांद्रा मुंबई येथे सोहळा संपन्न

kalaranjan news