प्रांजल शैलेंद्र सुरडकर ही कथ्थक, बॉलीवूड, आणि लावणी नृत्याची विद्यार्थीनी आहे. तिने ११ लघुपटांमध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून ६ पुरस्कार मिळवले आहेत.”ओयासिस” आणि”अण्णांची शेवटची इच्छा” या नाटकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
२०२१ मध्ये महाकवी वामनदादा कर्डक कलारत्न पुरस्कार मिळवला. २०२२ मध्ये नागसेन फेस्टिवलमध्ये मिलिंद पुरस्काराने सन्मानित झाली. वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात लावणी नृत्य एकांकीका सादर केली.
तिने २०१८ मध्ये महिला दिनानिमित्त गौरविण्यात आले आणि २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय प्राईम पुरस्कार मिळवला. प्रांजल, महाकवी वामनदादा कर्डक यांची वंशज आणि आदर्श शिक्षक एस.डी. सुरडकर (सुरडकर गुरुजी) यांची नात आहे. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.