अकोला येथे मागील सात वर्षांपासून प्रख्यात लेखिका तथा अभिनय गुरुवर्य प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र, अकोला या संस्थेच्या सुमारे एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना हिंदी,मराठी,तमिळ,तेलुगु चित्रपट,मालिका,जाहिराती, लघुचित्रपट,वेबसिरीज,रंगभूमीच्या माध्यमातून सुरेख संधी मिळून विद्यार्थी कलाकारांनी आपले एक स्वतंत्र स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे.
नुकत्याच नाशिक येथे ‘कलावंत विचार मंच’,’कमल फिल्म प्राॅडक्शन’च्या वतीने नाशिक येथे आयोजित परशुराम साईखेडकर सभागृहामध्ये अकोला येथील ‘आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमी,अकोला’ चे ग्लॅमरस विद्यार्थी तथा प्रसिध्द बालकलाकार चि.स्वराज सोसे, कु.जागृती खुरपे आणि कु.तनिष्का ब्राम्हणवाडे या तिन्ही हरहुन्नरी कलाकारांना ‘राज्यस्तरीय बालकलावंत पुरस्कार-२०२४’हा सन्मान देऊन गौरवान्वित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ‘प्रमुख अतिथी’ म्हणून प्रा.दीपाली सोसे, सुनिल मोंढे ,प्रा.अनिल साळवे दिग्दर्शक ग्लोबल अडगाव मराठी चित्रपट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘धर्मवीर-२’,’सत्यशोधक’,’नाच ग घुमा’ या चित्रपटातील बालकलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
हरहुन्नरी बालकलाकार चि.स्वराज दीपाली आतिश सोसे याने ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’या लघुचित्रपटामध्ये तसेच चार लघुचित्रपट,संगीत अलबम,जाहिरातींध्ये केलेल्या प्रमुख लक्षवेधी भुमिकांसाठी आणि जागृती खुरपे व तनिष्का ब्राम्हणवाडे या प्रतिभावंत बालकलाकारांना अप्रतिम अभिनय व नृत्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करीत असल्याची माहिती ‘कलावंत विचार मंच,नाशिक’चे अध्यक्ष सुनिल मोंढे यांनी दिली.