कला कविता काव्य गीत पुरस्कार सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना “अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार'”

मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी अभिजात दर्जा/गौरव आणि अभिमान” या विषयावर उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल तसेच वर्षभर विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या साहित्यिकांना “अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार-२०२४” ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने फोंडा, गोवा येथील रहिवासी, गोमंतकीय साहित्यिक कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी (एनटिसी एड्युकॅअर नवचैतन्यचे संस्थापक) तसेच वाडे, सुकुर येथील गोमंतकीय कवयित्री मानसी जामसंडेकर यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल गोव्यातील साहित्यप्रेमींकडून आनंद व्यक्त करून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

गोमंतकीय साहित्यिक कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी आणि कवयित्री मानसी जामस॔डेकर व्यतिरिक्त देशातील इतर प्रदेशांतील साहित्यिक कवी/कवयित्रींना देखील हा नामवंत पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मा. सोमदत्त कुलकर्णी (हडपसर, पुणे), मा. उषा सत्येंद्र वराडे (पुणे), मा. संध्यारजनी सावकार (नाशिक), मा. श्रीकांत पाटील (रायगड), मा. श्रद्धा सुहास शिंदगीकर (वारजे, पुणे), मा. कालिंदी वाणी, प्रा. मन्नाडे रमा (लातूर), डॉ. दक्षा पंडित, मा. श्रीनिवास असलेकर (सातारा), मा. भारती कुलकर्णी (नौपाडा, ठाणे), मा. वैशाली वर्तक, मा. रविंद्र गाडगीळ (पुणे), मा. सुवर्णा पवार, ॲड. सुलभा गोगरकर (अमरावती), मा. शोभा कोठावदे (मुंबई), मा. कालिंदी वाणी (डोंबिवली), मा. संजय देशमुख, मा. जयश्री श्रोत्रिय (पुणे), मा. जमालोद्दिन शेख (सोलापूर), मा. मेघा शहा (कोल्हापूर), मा. प्रकाश धारणे (नाशिक), मा. सुगंधा जगदाळे (नागपूर), मा. विश्वजीत जगताप, मा. सविता मानकर (मध्यप्रदेश), मा. सुरेखा कुलकर्णी (सातारा), मा. अंकुश जाधव (रोहा), मा. सुवर्णा तावरे (विटा), मा. सरोज गाजरे (मुंबई), मा. मनोहर वाळिंबे (डोंबिवली), मा. करुणा शिंदे (पुणे), मा. केतकी सुतार (रोहा), मा. अलका वढावकर, मा. मानसी पाटील, मा. मंगल यादव (शिराळा) आणि मा. प्रांजली प्रविण काळबेंडे (वसई) यांचा सन्मान करण्यात आला.

या यशाबद्दल मोरणा कवीकट्टा समूह सांगली, महाराष्ट्राचे संस्थापक मा. संजय वसंत माने, अध्यक्ष विजय सातपुते आणि कार्याध्यक्ष सुभाष कासार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच एनटिसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ तर्फे सर्व साहित्यिक कवी-कवयित्रींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Related posts

सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्थेद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती थाटात साजरी

kalaranjan news

ज्येष्ठ नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्या असे नाशिक जिल्हा संघाचे उपाध्यक्ष निकम यांनी केले प्रतिपादन 

kalaranjan news

महेश अन्नापुरे यांचा कलात्मक प्रवास वाचून होणार भावुक

kalaranjan news