कन्याकुमारी (तमिळनाडू) येथील नुकत्याच झालेल्या एकविसाव्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील २९ खेळाडूंनी एकूण ५१ पदके जिंकत उपविजेतेपद पटकावले. यात ५ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ९ कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतातून १५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यजमान तामिळनाडूच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कर्नाटक संघ तिसऱ्या स्थानी राहिला. विजेत्या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले, प्रशिक्षक ओमकार सोनवणे दिलीप आवळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत विजेते खेळाडू पुढील प्रमाणे :- सिद्धी संपगावकर, रिद्धी संपगावकर, आध्या कांबळे, चैत्रा स्वामी, सिद्धी सोनवणे, मानसी भिसे, अवंती सकुंडे, ट्विंकल काकडे, देवश्री महाले, ओवी भराटे, आराध्या सहेजराव, अनवी पायगुडे, मनवा कासार, आरु सोनवणे, उर्वी चव्हाण , चैतन्य मोरे, प्रज्वल गायकवाड, प्रितेश राठोड, आराध्य सोहोनी, निरंजन घुले, शिवतेज कोले, आदित्य माळी , राजवीर चिंचवडे, प्रियांश गणेशकर, रोशन पाटील, सायुज्य गायकवाड , साकेत बाबर, शिवांश पाटील, आरव भोर.