मुरबाड प्रतिनिधी :
एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नकल करणे म्हणजे मिमिक्री. वाद्यवृंदांच्या कार्यक्रमांमध्ये मुख्य गायक वादकांना थोडी विश्रांती मिळावी आणि कार्यक्रम सुरू राहावा या हेतूने मिमिक्री कलाकार त्यांची कला सादर करत असतात. हा प्रकार चांगलाच लोकप्रिय झाल्यान त्याचे आता स्वतंत्र कार्यक्रम होतात. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील एकलहरे गावातील एक मिमिक्री कलाकार चांगलाच लोकप्रिय आहे.
कोण आहे कलाकार.? गणेश देसले मिमिक्री मॅन असं या हरहुन्नरी कलाकाराचं नाव आहे.
मुळचा एकलहरे गावचा असलेला गणेश 50 पेक्षा जास्त प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब आवाज काढतो मिमिक्री क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवण्याच ठरवलं गणेशने मिमिक्री क्षेत्रामध्ये खूपच मेहनत घेतली आणि या प्रवासाला सुरुवात केली. आवाजात स्पष्टता आणि लवचिकता अभिनय कौशल्य तांत्रिक ज्ञान वाचन प्रवाह अशा सगळी आवश्यक कौशल्यं त्याने शिकली. गणेश अनेक राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करतो. गणेशला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत आणि मोठमोठ्या कलाकारांसोबत गणेश कार्यक्रम कार्यक्रम करत असतो. आपल्या आवाजाने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
मिमिक्री सोपी नाही. शरद पवार, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते मकरंद अनासपुरे दादा कोंडके, निळू फुले, सयाजी शिंदे, अक्षय कुमार, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, जॉनी लिव्हर, महाराष्ट्राची गाणंकोकीळा लता मंगेशकर, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे , सुनील शेट्टी, नाना पाटेकर, ऋतिक रोशन, रितेश देशमुख राजकुमार, विजयराज, ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख, अमिताभ बच्चन तसेच ‘चला हवा येऊ द्या’ मधील निलेश साबळे, भाऊ कदम यांची मिमिक्री गणेश अफलातुन करतो. यांच्यासह 50 दिगजांची गणेश मिमिक्री करतो.
या मिमिक्रीसाठी त्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागते. चांगल्या आवाजातील अभिनयासाठी खूप मेहनत, संयम, जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे. मिमिक्री म्हणजे पानावरचे शब्द वाचणे नाही. त्यासाठी उत्तम अभिनय कौशल्य देखील लागतं. अभिनय कौशल्य असेल तर तुम्हाला अधिक आत्मविश्वास येतो आणि तुमची कला इतरांपर्यंत लवकर पोहोचते असा अनुभव गणेशने सांगितला आहे.