श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वं.श्री.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवाला मंगळवार पासून सुरुवात करण्यात आली.या पुण्यतिथी महोत्सव दरम्यान सातही दिवस भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दरम्यान युवा योग प्रशिक्षक योगाचार्य अक्षय धानोरकर यांचे ही योग व प्राणायाम शिबिराला सुरुवात झाली असून जीवनामध्ये योगाभ्यासचे महत्व जन सामान्य पर्यंत पोहचविण्याचे विशेष करून तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १६ ते २२ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत योग प्राणायाम शिबिराचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी या योगशिबिरचा लाभ घ्यावा. आसने व प्राणायाम च्या माध्यमातून स्वस्थ व निरोगी जीवनासाठी मदत होते. वंदनीय महाराजांनी योग अध्यात्मच्या माध्यमातून जीवनामध्ये दिव्य कार्य केलीत , राष्ट्रधर्म, सेवाधर्म, मानवधर्म असा त्रिवेणी संगम घडविला अनेक ग्रंथ साहित्य निर्मिती करून ग्रामोदय ते राष्ट्रोदय असा प्रवास योग अध्यात्म च्या माध्यमातूनच केला. त्यामुळे योगाचे अनन्य साधारण महत्व आहे. सोमवार २१ ऑक्टोंबर रोजी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या श्रद्धांजलीपर सोहळयासाठी लाखो अनुयायी मोझरीत दाखल होत असल्याने हा सोहळा नेत्रदिपक ठरतो, हे विशेष.