लेख

पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याने बौद्ध समाज बंधु भगिनीने केंद्राला दिले धन्यवाद

भारत कवितके कांदिवली, पश्चिम मुंबई
बुधवार दिनांक १६ आक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता कांदिवली पश्चिम येथील रेणुका नगर शेजारी असलेल्या तक्षशिला बुध्द विहारा मध्ये वार्ड क्रमांक २० चे मा.नगरसेवक बाळा तावडे यांच्या समवेत पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याने बौद्ध समाज बंधु भगिनीने केंद्राला दिले धन्यवाद. नगरसेवक बाळा तावडे यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली.या सदिच्छा भेटीत नगरसेवक बाळा तावडे यांनी तेथील तक्षशिला बुध्द विहार मध्ये बौद्ध समाज बंधु भगिनींशी प्रत्यक्ष संवाद साधला.

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांच्या दीर्घ कालीन पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याने नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानून धन्यवाद दिले.पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्या मागे काय उद्देश आहे,? यावर या वेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.यावेळी नगरसेवक बाळा तावडे, वार्डाचे सरचिटणीस गजानन गवई , तक्षशिला बुध्द विहाराचे पदाधिकारी प्रकाश किर्तीकर,सौ.आरती जाधव,सौ.सुषमा कांबळे,सौ.मघाडे ताई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

काळोखाच्या अंधारातील प्रकाश “पँथर वस्ताद दिलीप दंदी”

kalaranjan news

 संगीता संतोष ठलाल एक प्रेरणादायी प्रोत्साहन मंच

kalaranjan news

हेलपाटा कादंबरीतील हृदयस्पर्शी,भावस्पर्शी अनेक प्रसंग वाचुन वाचकाच्या डोळ्यात पाणी ….!

kalaranjan news