कला पुरस्कार

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या ४६ व्या वार्षिक सभेत ” हेलपाटा ” कादंबरीचा सन्मान

काल पुणे जिल्हा ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी पतसंस्थेची ४६ वी वार्षिक सभा पुणे जिल्हा सहकारी बॅकेच्या स्व .यशवंतराव चव्हाण भवन या सभागृहात मोठ्या उत्साहात व थाटात पार पडली .या सभेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे सन्मानिय मुख्यकार्यकारी अधिकारी श्री . संतोष पाटील सर ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी( ग्रा.प ) चे मा . श्री . नलावडे सर , महिला व बालकल्याणच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती कडु मॅडम तसेच ग्रामसेवक पतसंस्थेचे सन्मानिय चेअसमन श्री .प्रदीप खिल्लारी सर ,व्हा .चेअरमन सौ.छाया साकोरे मॅडम ,खजिनदार सौ .आलका रहाने मॅडम ,सेक्रेटरी श्री पद्माकर डोंबाळे सर , पतसंस्थेचे घटनासमिती सदस्य मा . श्री . कुंभार सर , ग्रामसेवक संघटणेचे जिल्हा अध्यक्ष .मा .श्री .अमोलजी .सचिव सर . पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन मा .श्री . राजेंद्र साञस भाऊसाहेब व जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी त्यांचे कुटुंबियासमवेत हजर होते .

या दैतिप्यमान सोहळ्यात जिल्ह्यातील उत्कृष्ठ काम करणार्‍या ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी यांचा मा .ceo सर यांचे हस्ते सन्मान करणेत आला .तसेच गेली अनेक वर्ष सेवा बजाऊन सेवानिवृत्त झालेल्या ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांचा निरोपाचा सन्मान मा .ceo सर यांचे हस्ते करण्यात आला . त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या सभासदांच्या अनेक पाल्यांनी दहावी, बारावी व स्पर्धा परिक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करणेत आले . या प्रसंगी श्री . तानाजी धरणे यांच्या ” हेलपाटा ” कादंबरीला राज्यभरातुन १३ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने व कादंबरीचा ” स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे P.HD संशोधन अभ्यासासाठी निवड झाली असल्याने ग्रामसेवक संघटना पुणे जिल्हा व ग्रामसेवक पतसंस्था पुणे यांचे वतिने मा .मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. संतोषजी पाटील साहेब यांचे हस्ते श्री . तानाजी धरणे यांचा ” हेलपाटा ” कादंबरीचा यथोचित शाल, श्रीफळ, गुच्छ व आकर्षक सम्नानचिन्ह देऊन सन्मान करणेत आला .

यावेळी श्री . तानाजी धरणे यांनी आपली ‘ संघर्षमय व हृदयस्पर्शी हेलपाटा कादंबरी ‘ मान्यवरांना प्रदान केली . एवढ्या धकाधकीच्या जीवनात आपण आपली नोकरी संभाळून ” संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी लिहिली त्याबद्दल मा . सीईओ सर यांनी तानाजी धरणे यांचे विशेष कौतुक केले . या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व सन्मानिय संचालक सर्व ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित होते . सर्व उपस्थितांनी हेलपाटा कादंबरीचे केलेले कौतुक पाहुन आपण भारावून गेल्याचं मत श्री . तानाजी धरणे यांनी व्यक्त केले . व आयोजकांचे आभार मानले .

Related posts

सीलंबन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पटकावले उपविजेतेपद

kalaranjan news

प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वात काला गोटा येथे पारधी बांधवांसमवेत दीपावली स्नेहमिलन सोहळा संपन्न

kalaranjan news

विरार येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी 

kalaranjan news