उद्योग

स्वयंमसिद्ध उद्योजकता विकास अभियानाच्या प्रयत्नाला ला यश

अमरावती प्रतिनिधी – शशांक चौधरी                            कोराडी महालक्ष्मी मातेच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत महिलांना रोजगार मिळाला पाहिजे या भावनेने प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे एका प्रकल्पाच्या शोधात होते. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात महालक्ष्मी मातेच्या मंदिरात निर्माण झालेल्या निर्माल्याचा वापर योग्य प्रकारे कसा करावा हाही प्रश्न होता या संदर्भात बावनकुळे यांनी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानचे अध्यक्ष किरण पातुरकर आणि संयोजिका प्रा.डॉ. मोनिका उमक यांच्याशी चर्चा झाली.

 

या चर्चे दरम्यान किरण पातुरकर यांनी निर्माल्यापासुन अगरबत्ती ची संकल्पना बावनकुळे यांना सुचविली आणि ही संकल्पना बावनकुळे यांना आवडली आणि त्यांनी हातोहात उचलून धरली. या संदर्भातील बैठक महिला बालविकास मंडळाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या सोबत झाल्या. प्रोजेक्ट रीपोट तयार झाला.शासनाने नाविन्यपूर्ण योजनेतून पैसा उपलब्ध करून दिला.

गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पावर स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान मार्फत आमची मेहनत सुरु होती. या प्रकल्पातील महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान करणार आहे. तसेच या प्रकल्पाला बायबँग गॅरन्टी सुद्धा दिली आहे. शासनाच्या नियमाच्या अंतर्गत राहून कच्चा माल पुरविण्यापासून ते पक्का माल बनविण्याचे काम सुद्धा करण्यात येणार आहे. या प्रकल्पा मध्ये सुरुवातीला ३५ अगरबत्ती च्या मशिन लावण्यात आल्या आहे. १०० महिलांना त्यावर रोजगार मिळणार आहे. भविष्यामध्ये महालक्ष्मी जगदंबा या नावाने ब्रँन्ड विकसित करून मार्केटिंग सुद्धा करण्यात येणार आहे. या वेळी जवळपास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ५०० महिलांना रोजगार मिळेल.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकारला असून जगदंबा कोराडी महालक्ष्मी मातेच्या परिसरामध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन १६ सप्टेबरला मा. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. यावेळी महिला बालविकास चे आयुक्त मा. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

या उद्घाटनाला जोडूनच भव्य महिला मेळाव्यांचे आयोजन केले होते. या सर्व कार्यकर्माचे सूत्र संचालन स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानच्या संयोजिका प्रा. डॉ. मोनिका उमक यांनी केले. लवकरच अमरावती येथे सुद्धा अशाच प्रकारचा अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्याचा मानस स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी केला आहे.

Related posts

बारामती मध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणन्याचा प्रयत्न करणार – युगेंद्र पवार.

kalaranjan news

अरिंजय फाउंडेशन प्रस्तावित वसुंधरा गो संवर्धन केंद्र,भूमिपूजन सोहळा

kalaranjan news

नाहीरे वर्गातील महिलांसाठी आणिक फायनान्शिअल सर्व्हिसेसचं कार्य गतिमान

kalaranjan news