अमरावती-: स्थानिक अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ दस्तगीर येथे आरोग्य सहाय्यक पदावर असलेले धर्मा वानखडे याच्या सामाजिक व चित्रपट विषयक कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा इंटरनॅशनल प्राईड अवॉर्ड 2024 प्राप्त झालेला आहे. सदर पुरस्कार आएससो प्रमाणित,आणि जी 20 नुसार असून, सुष्म लघु एवम मध्यम उद्दम व नीती आयोगाचा आहे.
डॉ धर्मा वानखडे हे आरोग्य विभागात काम करून सुद्धा आपला छंद जोपासत आणि सामाजिक बांधिलकी जोपासत कला क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विविध वर्षापासून काम करतात. ह्यूमन राइट्स कौन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष पदाच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र सोशल फोरमचे संस्थापक/अध्यक्ष पदाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात प्रत्यक्ष कार्य असतात, महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक/निरीक्षक कर्मचारी संघटनेचे संस्थापक,राज्यअध्यक्ष सुद्धा आहेत.
तसेच ते अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया.अंडरटेकिंग भारत सरकारचे,जिल्हा डायरेक्टर असून, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे दिग्दर्शन विभागाचे सदस्य सुद्धा आहे. त्यांना वैयक्तिक आरोग्यरत्न पुरस्कार,,अब्दुल कलाम रत्न अवॉर्ड ,दादासाहेब फाळके बेस्ट डायरेक्टर ऑफ द इयर अवॉर्ड , राष्ट्रीय क्लागौरव पुरस्कार,,कुशल नेतृत्व जननायक पुरस्कार , इंडियन आयकॉन अवॉर्ड , अमरावती भूषण पुरस्कार ,आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला पुरस्कार, असे भरपूर पुरस्कार मिळालेले असून त्यांच्या सामाजिक व आरोग्य विषयक असणाऱ्या लघुचित्रपटाला आतापरेंत 68 पुरस्कार प्राप्त झालेले असून,
त्यांनी ते लघुचित्रपट स्वतः निर्मिती,लेखन,अभिनय आणि दिग्गदर्शन केलेले आहेत.तसेच आर्ट आणि सोशल वर्क मध्ये त्यांना डॉक्टरेट सुद्धा मिळालेली आहे.अशा असंख्य पुरस्काराने डॉ.धर्मा वानखडे सन्मानित आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा इंटरनॅशनल प्राईड अवॉर्ड 2024 प्राप्त झालेला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.